घरमुंबईमुंबईला पावसाने झोडपले, म. रेल्वेला तडाखा

मुंबईला पावसाने झोडपले, म. रेल्वेला तडाखा

Subscribe

कल्याण-कसारा मार्गावरील वाहतूक विस्कळीत, सीएसएमटी स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी, टिटवाळ्यात मालगाडीचे कपलिंग तुटले, पावसामुळे रेल्वे रुळांवर पाणी

विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसाने गुरुवारी सायंकाळी मुंबई आणि उपनगराला अक्षरश: झोडपले, तर मध्य रेल्वेच्या सेवेला चांगलाच तडाखा दिला. पावसामुळे मुंबईच्या पश्चिम आणि पूर्व उपनगरातील सखल भागांत पाणी साचले. मुसळधार पावसामुळे रस्ते व रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला.अंधेरी सब वे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. मध्य रेल्वेच्या कळवा-मुंब्रा, नाहूर, कुर्ला, भांडुप स्थानकांतील रुळांवर पाणी साचल्याने कल्याण-कसारा मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.

तर दुसरीकडे आंबिवली ते टिटवाळा स्थानकादरम्यान डाऊन दिशेने जाणार्‍या मालगाडीचे डब्बे निखळले. परिणामी कामावरून घरी निघालेल्या चाकरमान्यांचा मोठा खोळंबा झाला. रेल्वे वाहतूक ऐन गर्दीच्या वेळेत सुमारे अर्धा तास उशिराने धावत होती. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, कुर्ला, घाटकोपर, दादर स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. मुसळधार पावसामुळे सीएसएमटी ते ठाणे आणि दिवा, डोंबिवली, कल्याण या सेक्शनमध्ये लोकल ट्रेन्स उशिराने धावत असल्याची माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क प्रमुख शिवाजी सुतार यांनी दिली.

- Advertisement -

मुसळधार पावसाचा फटका प्रामुख्याने मध्य रेल्वेला बसला. म. रेल्वेच्या अप आणि डाऊन या दोन्ही मार्गांवर परिणाम झाला. सुदैवाने मेन लाईन तसेच हार्बर मार्गावरही पाऊस असूनही लोकल धावत होत्या. संध्याकाळी ५ ते ७ या कालावधीत शहर भागात दादर येथे ३३ मिमी, वडाळा – २९ मिमी, ब्रिटनिया पंपिंग स्टेशन परिसर १९ मिमी, वरळी – २१ मिमी, मलबार हिल – २० मिमी, सीएसएमटी – ३१ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली.

पूर्व उपनगरातील, विक्रोळी – ३२ मिमी, मुलुंड – २८ मिमी, चेंबूर – २५ मिमी, भांडुप – ३४ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

- Advertisement -

तर सर्वात जास्त पाऊस पश्चिम उपनगरात पडला आहे. कांदिवली – ७० मिमी, बोरिवली – ६५ मिमी, मालाड – ५९ मिमी, दहिसर – ४८ मिमी, मरोळ – २० मिमी, वांद्रे – ३२ मिमी, अंधेरी १४ मिमी, गोरेगाव १९ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

टिटवाळ्यात मालगाडीचे डबे निखळले
जोरदार पावसामुळे गुरूवारी मध्य रेल्वेच्या वाहतुकीचा खोळंबा झाला होता. त्यातच सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान अंबिवली ते टिटवाळा स्थानकादरम्यान मालगाडीचे डबे निखळल्याने वाहतूक पूर्णत: ठप्प झाली. परिणामी कामगावरून घरी जाणार्‍या प्रवाशांचे मोठे हाल झाले.

सीएसएमटी ते ठाणे आणि दिवा ते कल्याण या भागात झालेल्या जोरदार पावसामुळे मध्य रेल्वेची लोकल सेवा १० ते १५ मिनिटे उशीराने धावत होती. त्यात च सायंकाळी ६ वाजून २० मिनिटांनी आंबिवली ते टिटवाळा स्थानकादरम्यान मालगाडीचा मोठा अपघात घडला. डाऊन दिशेने जाणार्‍या मालगाडीचे डबे निखळल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे कल्याण आणि कसारा या दोन्ही दिशेला जाणार्‍या लोकल एका मागे एक खोळंबल्या होत्या. ही घटना सायंकाळी ६ वाजून २० मिनिटांनी घडली होती. या घटनेची माहिती नियंत्रण कक्षाला मिळतातच रेल्वे कर्मचारी आणि अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन निखळलेले डबे पुन्हा जोडले. त्यानंतर ६ वाजून ४५ मिनिटांनी रेल्वे वाहतूक पूर्ववत करण्यात आली. ही घटना सायंकाळी घडल्याने आणि लोकल सेवा ठप्प झाल्याने कामावरून घरी परतणार्‍या प्रवाशांचे चांगलेच हाल झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -