घरमुंबईमंत्रालयालाही पावसाचा फटका; तळ मजल्यावरील सिलिंगचा भाग कोसळला

मंत्रालयालाही पावसाचा फटका; तळ मजल्यावरील सिलिंगचा भाग कोसळला

Subscribe

मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे मंत्रालयातील सिलिंगवर पाणी झिरपल्याने दुपारी तीनच्या सुमारास सिलिंगचा भाग कोसळला.

सकाळपासून पडणाऱ्या पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी पाणी भरले. तसेच अंधेरी येथील पेपर बॉक्स येथे एक भिंत देखील पडली. मात्र याच पावसाचा फटका राज्याचा गाडा ज्या मंत्रालयातून हाकला जातो त्या मंत्रालयालाही बसला. मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे मंत्रालयातील सिलिंगवर पाणी झिरपल्याने दुपारी तीनच्या सुमारास सिलिंगचा भाग कोसळला. मंत्रालयाच्या तळमजल्यावरच पोलीस नियंत्रण कक्ष आहे. या ठिकाणी सामान्य नागरिकांसह पोलिसांचा कायम राबता असतो. याच तळमजल्यावर अचानक हा भाग कोसळल्याने पोलिसांची धावाधाव झाली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनीही घटनास्थळाची पाहणी करून ताबडतोब कोसळलेल्या भागाचा ढीग रिकामा केला. या घटनेबाबत मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनीही बोलण्यास नकार दिला.

मुसळधार पावसाचा मंत्रालयालाही फटका; तळ मजल्यावरील सिलिंगचा भाग कोसळला

मुसळधार पावसाचा मंत्रालयालाही फटका #MyMahanagar

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಸೋಮವಾರ, ಜುಲೈ 8, 2019

- Advertisement -

 

गेल्या वर्षीच्या पहिल्याच पावसात सातव्या मजल्यावरील पशु संवर्धन मंत्री महादेव जानकर यांच्या दालनाबाहेर ही गळती लागली होती. मंत्रालयाला लागलेल्या आगी नंतर २०११ साली मंत्रालयाच्या मुख्य इमारतीचे नूतनीकरण करण्यात आले असून इमारतीच्या आतल्या बाजूला कॉरपोरेट कार्यालयाचा चेहरा देण्यात आला आहे. मात्र या नूतनीकरणात अनेक त्रुटी असल्याचे समोर येत आहेत.

- Advertisement -

२४ तासांत मुसळधार पाऊस

गेल्या काही दिवसांत मुंबईत विश्रांती घेतलेल्या पावसाने सोमवारपासून पुन्हा बरसायला सुरुवात केली आहे. आज पहाटेपासूनच मुंबईसह, ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे जागोजागी पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले. काही ठिकाणी संरक्षण भिंत कोसळली तर काही परिसरात गुडघाभर पाणी साचल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला. पावसाने मुसळधार बरसायला सुरुवात केली असून पुढील २४ असाच पाऊस राहणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनीही सतर्कतेचा इशारा दिला आहे.

हेही वाचा –

…म्हणून भेटले राज ठाकरे सोनिया गांधींना! बैठकीत ‘यावर’ झाली चर्चा!

आता मुंबईत करा फक्त ५ रुपयात प्रवास

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -