घरमुंबईडिसेंबरअखेरीस ‘लालपरी’ होणार हायटेक

डिसेंबरअखेरीस ‘लालपरी’ होणार हायटेक

Subscribe

सर्व बसगाड्यांवर ट्रॅकींग यंत्रणा बसवणार

ग्रामीण भागाची लालपरी अर्थात एसटी बसगाडी डिसेंबर २०१९ अखेरपर्यंत हायटेक होणार आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या १८ हजार ५०० गाड्यांना व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टम (व्हीटीएस) बसविण्यात येणार आहे. सध्या हा प्रकल्प नाशिक जिल्ह्यात सुरू आहे. मार्च २०१९ पर्यंत राज्यातील सर्व गाड्यांमध्ये ही यंत्रणा बसवण्यात येणार होती. मात्र जीपीएस नवीन व्हर्जन आल्याने आणि यंत्रणेत सुधारणा करण्यासाठी आणखी ६ महिने लागणार असल्याने डिसेंबर अखेरपर्यंत सर्व गाड्यांमध्ये ही यंत्रणा बसवण्यात येईल, अशी माहिती एसटी मुख्य सुरक्षा व दक्षात अधिकारी मनोज लोहिया यांनी दिली.

एसटी बसगाडी सुटण्याची आणि पोहोचण्याची वेळ प्रवाशांना समजावी, अपघात झाल्यास घटनास्थळी तत्काळ मदत पोहोचवता यावी, यासाठी ही यंत्रणा महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. याचे कंत्राट रोज मरेटा या कंपनीला देण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे ३४ कोटी रुपयांच्या खर्च येणार आहे. सध्या हा प्रकल्प नाशिक भागात ्रप्रायोगिक स्तरावर सुरू आहे. मात्र या दरम्यान काही त्रुटी आढळूण आल्या आहेत. त्यामुळे हा प्रकल्प राज्यभर राबवणे लांबले आहे. आता डिसेंबर २०१९ पर्यंत राज्यभरातील सर्व एसटी बसगाड्यांमध्ये व्हीटीएस यंत्रणा बसवण्यात येणार आहे. प्रवाशांसाठी महामंडळ एक अ‍ॅपही विकसित करणार आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून प्रवाशांना एका क्लीकवर त्यांना त्यांच्या गाडीचे ठिकाण समजू शकणार आहे. त्यासाठीही व्हीटीएस यंत्रणा उपयोगी ठरणार आहे.

- Advertisement -

व्हीटीएस हा प्रकल्प राज्याच्या एसटी महामंडळ आणि एसटीच्या प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण आहे. ही यंत्रणा अधिक आधुनिक आणि सक्षम बनवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
– मनोज लोहिया, मुख्य सुरक्षा व दक्षात अधिकारी

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -