घरमुंबईमुंबईत हायफाय सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

मुंबईत हायफाय सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

Subscribe

ओशिवरा पोलिसांनी एका हायफाय सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. याप्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह तिघांना अटक तर एका मालिका अभिनेत्रीची सुटका केली.

मोबाईलवर ग्राहकांशी संपर्क साधून एका ठराविक ठिकाणी ग्राहकांसोबत कॉलगर्लला पाठविणार्‍या एका हायफाय सेक्स रॅकेटचा ओशिवरा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी एका महिलेसह तिघांना पोलिसांनी अटक केली असून ही टोळी गर्भश्रीमतांसाठी मुली पुरविण्याचे काम करीत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अब्बास अली चौधरी, तब्बसूम अन्सारी आणि गिरीश जाधव अशी तिघांची नावे असून अटकेनंतर या तिघांनाही शिवडी येथील लोकल कोर्टाने बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या तिघांच्या तावडीतून पोलिसांनी एका तरुणीची सुटका केली असून ती तरुणी मालिका अभिनेत्री आहे. या अभिनेत्रीने गेल्या वर्षी झालेल्या एका स्पर्धेत तिने ‘मिस मुंबई’ हा किताब पटकाविला होता, असे पोलीस निरीक्षक रघुनाथ कदम यांनी सांगितले.

काय आहे नेमके प्रकरण?

अंधेरी परिसरात सेक्स रॅकेट चालविणारी एक टोळी असून ही टोळी त्यांचे काम मोबाईलवरुन करते. मोबाईलवरुन ग्राहकांशी संपर्क साधल्यानंतर त्यांना एका ठराविक ठिकाणी बोलावून तिथे काही कॉलगर्ल दाखवून सौदा पक्का करुन त्यांना ग्राहकांसोबत पाठविले जात होते, अशी माहिती ओशिवरा पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर एका बोगस ग्राहकाच्या माध्यमातून त्यांनी एका दलालला संपर्क साधून काही मुलींना घेऊन जोगेश्वरी येथे बोलाविले होते. ठरल्याप्रमाणे संबंधित दलाल एका तरुणीसोबत जोगेश्वरीतील लिंक रोडवरील मिरा टॉवरमध्ये असलेल्या एसएसडी कॅफे कॉफी डेजवळ एका मॅर्सिडिज कारमधून आला होता. यावेळी या दलालाने एका तरुणीला गिर्‍हाईकाला दाखविले, त्याने ती मुलगी पसंत केल्यानंतर त्याला साठ हजार रुपये दिले होते.

- Advertisement -

मर्सिडिज कार, तीन मोबाईल, कॅश आणि इतर साहित्य जप्त

हा व्यवहार सुरु असताना पोलिसांनी तिथे छापा टाकून गिरीश जाधव, अब्बास अली चौधरी आणि तब्बसूम चौधरी या तिघांना अटक केली. यावेळी तिथे असलेल्या एका तरुणीची पोलिसांनी सुटका केली. चौकशीअंती ही तरुणी हिंदी मालिका अभिनेत्री असून तिने आतापर्यंत काही मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच गेल्या वर्षी एका खाजगी कंपनीने आयोजित केलेल्या मिस मुंबईत स्पर्धेत तिने भाग घेतला होता. त्यात ती मिस मुंबई झाली होती. मेडीकलनंतर तिला चेंबूरच्या महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून ती या तिन्ही दलालांच्या संपर्कात होती. दोन ते तीन तासांसाठी ती साठ ते एक लाख रुपये घेत होती. या कारवाईत पोलिसांनी तीस लाख रुपयांची मर्सिडिज कार, तीन मोबाईल, कॅश आणि इतर साहित्य जप्त केले आहे. तिन्ही आरोपींविरुद्ध पिटा कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली असून याच गुन्ह्यात त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक रघुनाथ कदम यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -