घरमहाराष्ट्रनाशिकसप्तश्रृंगीदेवीच्या सुकर दर्शनासाठी रॅम्प

सप्तश्रृंगीदेवीच्या सुकर दर्शनासाठी रॅम्प

Subscribe

नवरात्रोत्सवाची तयारी, कोंडी टाळण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार भाविकांसाठी रॅम्प

नवरात्रोत्सवात सप्तश्रृंगी निवासिनी देवीच्या सुकर दर्शनासाठी यंदा प्रथमच मंदिरात खास रॅम्प उभारला जाणार आहे. याशिवाय गडावर 86 सीसीटीव्ही, मेटल डिटेक्टरसह सुमारे 900 पोलिस, खासगी सुरक्षारक्षक व होमगार्ड ट्रस्टचे कर्मचारी तैनात राहणार आहेत. गर्दी टाळण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांच्या सूचनेनुसार ही व्यवस्था करण्यात आली आहे.
सुरक्षिततेसाठी शीतकड्यावरही दोन सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत. त्याचबरोबर शिवालय तलाव, देवीचा गाभारा आणि बारीमार्ग, पहिली पायरी इ. ठिकाणी सुमारे 86 सीसीटीव्ही देवस्थानकडून बसविले जाणार आहेत. या यंत्रणेचे नियंत्रण देवस्थानच्या कार्यालयातून होईल.

पहिली पायरी ते देवीचा सभामंडप यादरम्यान 15 बार्‍यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. भाविकांची प्रचंद गर्दी लक्षात घेत येथे चेंगराचेंगरी अथवा गोंधळ उडू नये म्हणून 90 कर्मचारी बारीवर लक्ष ठेवून राहणार आहेत. पहिल्या पायरीजवळ चार मेटल डिटेक्टर लावण्यात येणार आहेत. तसेच, येथेच नारळ फोडण्यासाठी पाच मशीन लावण्यात येतील. तसेच कापूर, उदबत्ती अर्पण करण्याची व्यवस्था पहिल्या पायरीजवळ करण्यात आलेली आहे, असे ट्रस्टचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांनी कळविले आहे.

- Advertisement -

गडावर भाविकांना आरोग्याची समस्या उद्भवू नये, यासाठी ट्रस्टच्या वतीने चालविण्यात येणारा धर्मार्थ दवाखाना 24 तास सुरू राहणार आहे. वीजपुरवठा खंडीत झाल्यास दोन जनरेटर सज्ज ठेवण्यात आले आहे. गाभार्‍यात सेवेकरी, पुजारी असणार आहेत. तसेच 40 स्वच्छता कर्मचारी मंदिरात साफसफाईचेे काम 24 तास करणार आहेत. मंदिरात 20 सुरक्षा रक्षकांसह 2 बंदूकधारी सुरक्षा रक्षकही यंदा नवरात्रात दिसतील. व्हीआयपी दर्शन व्यवस्था ट्रस्टच्या मुख्यालयातून करण्यात येणार आहे.

शिवालय तलावावर 10 जीवरक्षक दल तैनात असतील. त्यांना 12 लाइफ जॅकेट देण्यात आलेले आहे. 18 स्टे्रचर सज्ज ठेवण्यात आलेले आहेत. तर 32 हँडी मेटल डिटेक्टर सुरक्षारक्षकांकडे देण्यात येणार आहेत. अग्निशमन व्यवस्था नाशिक महापालिकेच्या वतीने गडावर करण्यात आलेली आहे.

- Advertisement -

पायरी, रोपे-वेने आलेल्या भाविकांचे नियोजन

गडावर देवीच्या दर्शनाला जाण्यासाठी पायरीमार्ग आणि रोप-वे हे दोन मार्ग असल्याने या मार्गाने येणार्‍या भाविकांचा मिलाफ देवीच्या सभामंडपात होतो. तेथे एकबारी पायरीने येणार्‍या भाविकांना, तर रोप-वेच्या दोन ट्रॉलीच्या भाविकांना दर्शनासाठी गाभार्‍यात सोडण्यात येणार आहे. यामुळे चेंगराचेंगरी टळेल. त्याचबरोबर देवी दर्शनाला विलंब होणार नाही. कोजागिरी पौर्णिमेच्या कालावधीत 12 ते 14 ऑक्टाबर या कालावधीत मोफत अन्नदान सेवा ट्रस्टकडून दिली जाणार आहे.– भगवान नेरकर, सप्तश्रुंगी निवासिनी देवी ट्रस्ट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -