घरमुंबईहायटेक महापालिकेला मुख्य वैद्यकीय अधिकारी मिळेना

हायटेक महापालिकेला मुख्य वैद्यकीय अधिकारी मिळेना

Subscribe

महापालिकेला आरोग्य विभागासाठी योग्य अधिकारी भेटत नसल्याने आजमितीला शहरातील मनपाची आरोग्य सेवा डगमगली आहे. सन 2007 नंतर आजतयागत मनपा प्रशासनाला साधा मुख्य वैद्यकीय अधिकारी नेमता आला नसून प्रभारी अधिकार्‍याच्या खांद्यावर जादा भार देऊन आरोग्य विभागाचा कारभार सुरू आहे.

महापालिकेला आरोग्य विभागासाठी योग्य अधिकारी भेटत नसल्याने आजमितीला शहरातील मनपाची आरोग्य सेवा डगमगली आहे. सन 2007 नंतर आजतयागत मनपा प्रशासनाला साधा मुख्य वैद्यकीय अधिकारी नेमता आला नसून प्रभारी अधिकार्‍याच्या खांद्यावर जादा भार देऊन आरोग्य विभागाचा कारभार सुरू आहे. यामुळेच मनपाच्या रुग्णालयात असुविधांचा डोंगर उभारला असून याला फक्त प्रशासन जबाबदार आहे. सत्ताधारी पक्षही याकडे दुर्लक्ष करत असल्याने अजून किती दिवस सामान्य नागरिकांच्या आरोग्याशी प्रशासन खेळणार? असा प्रश्न शिवसेना गटनेते द्वारकानाथ भोईर यांनी उपस्थित केला आहे.

करोडो रुपये खर्च करून कोपरखैरणे, तुर्भे, नेरूळ, बेलापूर व ऐरोली विभागात प्रशासनाच्या माध्यमातून भव्य दिव्य रुग्णालये उभारण्यात आली आहेत. त्या रुग्णालयात कर्मचारी वर्गच नसल्याने आजही ती रुग्णालये नागरिकांना देण्यात येणार्‍या सुविधांपासून वंचित आहेत. कर्मचारी वर्ग लवकरात लवकर भरण्यात येणार असून तो कधी पण हे सांगता येणार नाही, असे यावेळी प्रभारी मुख्य वैद्यकीय अधिकारी दयानंद खटके यांनी सांगितले. प्रशासनाच्या आरोग्य विभागावर सत्ताधार्‍यांच्या अंकुश नसल्याने आरोग्य सेवा डगमगली आहे. कोपरखैरणे आणि तुर्भे येथील माता-बाल रुग्णालये बंद असल्यामुळे तसेच नेरुळ, बेलापूर, ऐरोली येथील रुग्णालये केवळ बाह्यरुग्ण विभाग आणि सामान्य प्रसूतीपर्यंतच सीमित राहिल्यामुळे संपूर्ण नवी मुंबईचा भार वाशी येथील रुग्णालयावरच पडत आहे. वाढत्या रुग्णसंख्येपुढे या रुग्णालयातील सेवाही अपुर्‍या पडू लागल्या आहेत. महापालिका क्षेत्रातील जवळपास सर्वच रुग्णालयांतून शस्त्रक्रिया आणि अन्य आजारांसाठी वाशी रुग्णालयाचाच संदर्भ दिला जात असल्याने येथील कर्मचार्‍यांवर कामाचा प्रचंड ताण पडत आहे. या प्रकरणाचे स्थायी समिती च्या बैठकीत पडसाद उमटले होते. बैठकीत सदस्यांनी आरोग्य विभागातील समस्यांसाठी प्रशासनाला धारेवर धरले होते. या घटनेला पाच दिवस उलटले तरी महत्वाच्या अश्या रक्त चाचण्या होत नाहीत त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisement -

रक्तचाचण्यांसाठी खासगी पॅथॉलॉजी लॅब

काही सदस्यांनी तर रक्त चाचण्या सबंधी मनपा वैद्यकीय अधिकारी व खाजगी पॅथॉलॉजी बरोबर आर्थिक संबंधा विषयी संशयही व्यक्त केला होता. गेल्या दीड दोन महिन्यांनपासून तापाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे प्रथम संदर्भ रुग्णालय वाशी च्या डॉक्टरांनी तपासणी केल्या नंतर सीबीसी,डेंग्यू,लेप्टो आदी तापाच्या साथीच्या चाचण्या करण्यास सांगत आहेत.परंतु सीबीसी ही सर्वसामान्य रक्त चाचणी गेल्या तीन महिन्यापासून होत नसल्याचे आरोग्य सूत्रांनी सांगितले. तर सध्या तापाची साथ मोठ्या प्रमाणात असल्याने साहजिकच तपासणी करणारे डॉक्टर डेंग्यू व लेप्टोची रक्त तपासणीचे आदेश देतात. परंतु ती रक्त चाचणी सुद्धा होत नसल्याने रुग्णांना बाहेरून हजारो रुपये खर्च करावी लागत आहेत. त्या चाचण्या करण्यासाठी मनपाच्या रक्त तपासणी केंद्र लगत असणार्‍या डॉ.टेकचंदाणी यांच्या एसआरएल डायग्नोस्टिक सेंटर मध्ये जावे लागत आहे. वाशीतील मनपाच्या रुग्णालयात आजही अनेक रुग्ण शास्त्रक्रियाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना आरएफटी म्हणजे मूत्रपिंडाची तपासणी व एलएफटी म्हणजे लिव्हरची तपासणी करण्यास सांगतात. परंतु या सुद्धा महागड्या रक्त तपासण्या गेल्या अनेक दिवसांपासून होत नसल्याने नाईलाजास्तव रुग्णांना डॉ.टेकचंदानी यांच्या रक्त तपासणी केंद्रात जावे लागत आहे. मनपा आयुक्त एन.रामस्वामी यांनी त्वरित लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

 

मनपा प्रशासनाची आरोग्य सेवा डगमगली असून यावर आम्ही वेळोवेळी महासभा व स्थायी समिती सभेत आवाज उठवला आहे.तरीही प्रशासन गंभीर होत नसल्याने यावर कठोर पावले उचलण्यासाठी आम्ही प्रशासनाला 15 दिवसांचा वेळ दिला आहे.त्यानंतर जर हालचाली झाल्या नाही तर होणार्‍या महासभा व स्थायी समिती सभेत हंगामा करू.  -द्वारकानाथ भोईर, गटनेते, शिवसेना

रक्त चाचण्या संबधी मशीनचा प्रस्ताव पास झाला असून त्याची वर्क ऑर्डर निघाली आहे.संबधित कंपनीला तशी ऑर्डर देण्यात आली असून त्यांनी मशीन देण्याची तयारी दर्शवली आहे.मात्र गणपती उत्सव आल्याने मशीन यायला उशीर लागेल. गणपती नंतर मशीन येताच सर्व रक्तचाचण्या या आपल्याकडेच केल्या जातील.- प्रशांत जवादे, मुख्य अधिकारी, वाशी मनपा रुग्णालय

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -