घरमुंबईहिमालय पुल दुर्घटना प्रकरण: कलकुटेला ५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

हिमालय पुल दुर्घटना प्रकरण: कलकुटेला ५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

Subscribe

मुंबईतल्या सीएसएमटी रेल्वे स्थानकाबाहेरील हिमालय पूल दुर्घटना प्रकरणी मुंबई महापालिकेचा सहाय्यक अभियंता एस. एफ. कलकुटेला आज कोर्टात हजर करण्यात आले होते. कोर्टाने एस. एफ कलकुटेला ५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. हिमालय पुल दुर्घटनेमप्रकरणी काल आझाद मैदान पोलिसांनी कलकुटेला अटक केली होती. आज कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्याची रवानगी पोलीस कोठडीत केली आहे. दरम्यान, पुल दर्घटना प्रकरणी याआधी मुंबई पोलिसांनी नीरजकुमार देसाई यांना अटक केली होती.

- Advertisement -

अशी घडली होती घटना

मुंबईतल्या सीएसएमटी रेल्वे स्थानकाबाहेरी हिमालय पूल १४ मार्चला कोसळला. संध्याकाळी साडेसातच्या दरम्यान ही दुर्घटना घडली होती. या पुल दुर्घटनेमध्ये ६ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला होता तर ३१ पेक्षा अधिक जण गंभीर जखमी झाले होते. संध्याकाळी गर्दीची वेळ होती सर्व जण कामावरुन घरी निघाले होते. या पुलावरुन मोठ्याप्रमाणात रहदारी होते. १४ मार्चला देखील या पुलावरुन सीएसएमटी रेल्वे स्थानकावर अनेक जण येत असताना ही घटना घडली होती.

आतापर्यंत यांच्यावर करण्यात आली कारवाई

हिमालय पूल दुर्घटने प्रकरणी आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला होता. या पुलाचे ऑडिट करणाऱ्या डी.डी. देसाई असोसिएटेड इंजिनियरिंग कन्सल्टन्ट आणि अनालिस्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीवर ठपका ठेवण्यात आला होता. या पूलाचा चुकीचा स्ट्रक्चरल अहवाल दिल्याचा ठपका असलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटर नीरजकुमार देसाई याला अटक करण्यात आली होती. सदोष मनुष्यवधाप्रकरणी त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली होती. तर, पूल दुर्घटनाप्रकरणी मुख्य अभियंता एस. ओ. कोरी, ए. आर. पाटील, उपमुख्य अभियंता आर. बी. तारे आणि सहाय्यक अभियंता एसएफ काकुळते यांचे निलंबन करण्यात आले होते. दरम्यान, या दुर्घटनेप्रकरणी रेल्वे आणि महापालिका अधिकाऱ्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर, महापालिकेचा सहाय्यक अभियंता एस. एफ. कलकुटेला अटक करण्यात आली. त्याला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – 

दुरुस्तीच्या कामांमध्ये हिमालय पुलाचा समावेशच नाही

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -