घरमुंबईसंगीत कारंज्यावर उलघडणार गिरण्यांचा इतिहासपट

संगीत कारंज्यावर उलघडणार गिरण्यांचा इतिहासपट

Subscribe

- इंडिया युनायटेड मिलमधील तलावावर संगीत कांरजे

काळाचौकी येथील इंडिया युनायटेड मिलच्या जागेतील तळ्याचे व परिसराचे सुशोभिकरण व म्युरलसह सर्व प्रकारच्या वापराचे प्लाझा बनवण्याचे काम हाती घेण्यात आल्यानंतर आता या तळ्यावर संगीत कारंज्याची निर्मिती करण्यात येणार आहे. या संगीत कारंज्याच्या जलपटावर मुंबई आणि कापड गिरण्यांचा इतिहास प्रदर्शित केला जाणार आहे. यासाठी महापालिकेच्यावतीने कंत्राटदाराची निवड करण्यात आली असून त्यासाठी सुमारे २५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे.

मुंबईची ओळख असलेल्या कापड गिरण्या बंद होवून त्या जागांवर कमर्शियल हब आणि निवासी इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे. त्यामुळे कापड गिरण्यांचा इतिहास सर्वांना माहित व्हावा यासाठी महापालिका, राज्य शासन व राष्ट्रीय वस्त्रोद्योग मंडळांच्या पुढाकाराने मुंबईतील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या काळाचौकी इंडिया युनायटेड मिल १ व २च्या जागेत वस्त्रोद्योग संग्रहालय व सांस्कृतिक केंद्र निर्माण करण्याचा मानस आहे. ज्यामुळे मुंबईच्या कापड गिरण्यांचा इतिहास, भूतकाळ आणि भविष्याकाळ यांची माहिती दिली जाणार आहे. या दोन्ही गिरण्यांममधील एकूण ६४ हजार ९६७ चौरस मीटरची जागा पुरातन वास्तूंसह, पुरातन प्रतिमा म्हणून घोषित करण्यात आली आहे. मिलच्या एकात्मिक विकासासाठी महापालिकेकडे एकूण ४४ हजार चौरस मीटरची जागा वर्ग करून त्यावर मनोरंजन मैदान तसेच वस्त्रोद्योग संग्रहालयासाठी राखीव आहे.

- Advertisement -

वस्त्रोद्योग संग्रहालयासाठी जे.जे. कलाविद्यालयाची प्रक्रल्प सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली होती. त्यांनी सूचवलेल्या आराखड्यांना मुंबई संस्कृती वारसा जतन समितीची मंजुरी प्राप्त झाली. त्यानुसार ४४ हजार चौरस मीटरपैंकी ७ हजार चौरस मीटर जागेवर मुंबईतील गिरण्यांचे जीवन व गिरणीबाबत नवीन पिढीला माहिती होण्यासाठी वस्त्रोद्योगाची म्युरल तसेच तळ्याचे व परिसराचे सुशोभिकरण आदींचे काम टप्पा एक मध्ये हाती घेण्यात आले. त्यातील तळ्याचे व परिसराचे सुशोभिकरण, म्युरल व विविध वापराच्या प्लाझासाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे. तर टप्पा एकमधील तळ्यात संगीत कारंजे निर्माण करून जलपटावर मुंबई व कापड गिरणी यांचा इतिहास प्रदर्शित करण्यासाठी लघुपट तयार करणे व प्रदर्शित करणे व पुढील चार वर्षे देखभाल करणे आदींसाठी देव एसव्ही प्रिमियरवर्ल्ड कन्सोर्टियम या कंपनीची निवड करण्यात आली आहे. पुढील एक वर्षात हा प्रकल्प पूर्ण केला जाणार असून त्यावर २५.४७ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -