घरमुंबईएमएसआरडीसी कार्यालयात राडा; अधिकाऱ्यांना मारहाण, शाईफेक

एमएसआरडीसी कार्यालयात राडा; अधिकाऱ्यांना मारहाण, शाईफेक

Subscribe

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) च्या वांद्रे-वरळी सी लिंक येथील कार्यालयात सोमवारी दुपारी काहीजणांनी राडा केला. अधिकाऱ्यांना काहीही माहीत नसतानाच त्यांच्यावर शाईफेक आणि मारहाण करण्यात आली. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी ३ जणांना अटक केली आहे. मारहाण करणारे कोण होते? ते कुठून आले? आणि त्यांचे म्हणणे काय होते? याविषयी काहीही माहिती नसल्याचे एमएसआरडीसीकडून सांगण्यात येत आहे.

सोमवारी दुपारच्या सुमारास एमएसआरडीसी कार्यालयात ८ ते १० महिला-पुरूषांचा जमाव घुसला. त्यांनी अधिकाऱ्यांशी वाद घालण्यास सुरूवात केली. त्यानंतर त्यांनी अगदी फाईलपासून ते खुर्चीपर्यंत हातात मिळेल ती वस्तू अधिकाऱ्यांना फेकून मारण्यास सुरूवात केली. या मारहाणीत विभागीय अभियंता सचिन निफाडे हे जखमी झाले. त्यांना लिलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काहींनी तर अधिकाऱ्यांवर शाई फेकण्याचाही प्रयत्न केला. या जमावाने अधिक्षक विवेक नवले यांच्यावर शाई फेकली. याप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा तसेच अधिकाऱ्याला मारहाण आदी गुन्हे नोंदवण्यात आले. याप्रकरणी पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -