घरमुंबईफेसबुकवर घरपोच दारू विक्रीच्या जाहिरातींचा सुळसुळाट

फेसबुकवर घरपोच दारू विक्रीच्या जाहिरातींचा सुळसुळाट

Subscribe

राज्यासह देशात सध्या करोनाच्या संकटामुळे लॉकडाऊन असून राज्यातील सर्व व्यवहार बंद आहेत. जीवनावश्यक वस्तू सोडल्या तर सर्वच प्रकारच्या विक्रीवर बंदी आहे. मात्र, या लॉकडाऊनच्या काळात सध्या जास्त पंचाईत झाली आहे ती तळीरामांची. अनेक ठिकाणी दारू मिळत नसल्याने तळीरामांनी दारूची दुकाने फोडल्याच्या घटनादेखील समोर आल्या आहेत. मात्र, सध्या फेसबुक, व्हॉट्सअप अशा सोशल साईट्सवर मोठ्या प्रमाणात घरपोच दारू विक्री केली जाईल, अशा जाहिराती देखील फिरताना पाहायला मिळत आहेत. पण, दिल्या क्रमांकावर पैसे भरूनही दारू काही मिळत नसल्यामुळे दारूप्रेमींची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.

विशेष म्हणजे फेसबुकवर काहींनी तसे पेज तयार करून त्यावर दारूचे फोटो टाकून घरपोच दारू दिली जाईल असे सांगत मोबाईल नंबरदेखील देण्यात आले आहेत. दरम्यान, या फेसबुकवर दारूची ऑनलाईन विक्री आणि होम डिलिव्हरी असे अनेक पेजेस तयार करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या फेसबुक पेजवर मुंबईतील अंधेरी, विलेपार्ले, तसेच इतर भागात देखील घरपोच दारूविक्री केली जाईल असे सांगून त्याखाली फोन नंबरदेखील दिले जात आहेत. तसेच तुम्ही पत्ता दिला की दारू घरपोच देणार असा दावा केलेला आहे.या पेजवर जे नंबर दिलेले आहेत त्यावर फोन केल्यास तुम्हाला कोणती दारू हवी, तसेच त्या दारूची किंमत सांगितली जाते. त्यानंतर तुम्हाला दारू हवी असल्यास तुमच्या घरचा पत्ता विचारला जातो. एकदा का ग्राहकाचा विश्वास बसला की तुम्हाला आगाऊ रक्कम द्यावी लागेल असे सांगून त्यांनतर एकदा का ग्राहकाने पैसे पाठवले की ना तो नंबर पुन्हा लागतो, ना दारू घरपोच मिळते.

- Advertisement -

लाजेखातर तळीराम तक्रार करणे टाळतात
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अशीच फसवणूक झालेल्या तळीरामांना विचारले असता दारू मिळवण्याच्या नादात आपली फसवणूक झाली हे कुणाला सांगायचे तरी कसे, यामुळे फसवणूक होऊनही आम्ही शांत राहतो असे त्यांनी सांगितले.

असे सांगितले जातात दारूचे दर                                                                                             

- Advertisement -

व्हिस्की खंबा – ३ ते ३५०० (ब्रँडनुसार किंमत ठरते)

बिअर – ५००

क्वॉटर – ६०० ते ७०० रुपये

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -