घरमुंबईमुंबई विद्यापीठ कुलसचिव नेमणुक वाद, राज्य सरकारला दणका

मुंबई विद्यापीठ कुलसचिव नेमणुक वाद, राज्य सरकारला दणका

Subscribe

ठाकरे सरकारने केलेली डॉ. रामदास अत्राम यांची नियुक्ती स्थगित

मुंबई विद्यापीठातील कुलसचिव नेमणुकीच्या वादामुळे राज्य सरकारच्या अडणीत वाढ होणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिव पदी डॉ.रामदास अत्राम यांना राज्य सरकारने नियुक्त केले होते. परंतु अत्राम यांची नियुक्ती मुंबई उच्च न्यायालयाने स्थगित केल्यामुले राज्य सरकारला चांगलाच दणका बसला आहे. राज्य सरकारने मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिवपदी डॉ. अत्राम यांची नियुकी केली होती. या नियुक्ती विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. अत्राम यांची नियुक्त करत मुंबई विद्यापीठाच्या स्वातंत्र्यावर घाला घातला असल्याचे याचिकेत म्हटले आहे. अत्राम यांच्या नियुक्तीचा वाद आता न्यायालयात पोहोचला आहे. अत्राम यांनी कुलसचिव पदाची सर्व सुत्रे बळीराम गायकवाड यांच्याकडे द्यावी असा आदेश न्यायालयाने दिला आहे.

काय आहे प्रकरण

मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अजय देशमुख यांचे निधन झाल्यावर विद्यापीठाचे कुलसचिव पद रिक्त होते. या रिक्त पदावर विद्यापीठाने प्रा. डॉ. बळीराम गायकवाड यांची प्रभारी कुलसचिवपदी नियुक्ती केली. परंतु महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६च्या कलम ८(५) नुसार राज्य सरकारने अधिकाराचा वापर करुन नागपूर येथील शासकीय विज्ञान संस्थेचे संचालक डॉ.रामदास आत्राम यांची विद्यापीठाच्या कुलसचिवपदी नियुक्ती केली.

- Advertisement -

राज्य सरकारने केलेल्या या नियुक्तीवर कुलगुरु डॉ. सुहास पेडणेकर यांनी पत्राद्वारे प्रधान सचिवांकडे नाराजी व्यक्त केली होती. या नियुक्तीवर धनेश सावंत यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. धनेश सावंत यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, विद्यापीठात एखादा भ्रष्टाचार किंवा अराजक परिस्थिती निर्माण झाल्यास सरकार हस्तक्षेप किंवा आपल्या अधिकाराचा वापर करते. परंतु अशी कोणतीही परिस्थिती निर्माण झाली नसताना सरकारने आपल्या अधिकारांचा वापर केलाच कसा असा प्रश्न या याचिकेत विचारण्यात आला आहे.

हे तर “फटकारे” खाणारे सरकार – आशिष शेलार

दरम्यान या प्रकरणावर भाजप नेते आशिष शेलार यांनी ट्विट करत ठाकरे सरकारवर ताशेरे ओढले आहेत. मुंबई विद्यापीठात ठाकरे सरकारने मनमानी करीत नियुक्त केलेल्या कुलसचिवांच्या नियुक्तीला उच्च न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे. तर बळीराम गायकवाड यांनाच पुन्हा कुलसचिव पदाची सुत्रे देण्यात आली. परिक्षेच्या मुद्द्यावरून तोंडघशी पडलेल्या ठाकरे सरकारचा अहंकार न्यायालय पुन्हा पुन्हा उतरवते आहे. हे तर “फटकारे” खाणारे सरकार असे भाजप नेते आशिष शेलार यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -