घरमुंबईकल्याणातील नव वधू-वराचा आदर्श; घरातल्या घरात शुभमंगल

कल्याणातील नव वधू-वराचा आदर्श; घरातल्या घरात शुभमंगल

Subscribe

करोनाच्या पार्श्वभूमीवर घेतला निर्णय

एकीकडे करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून गर्दी करू नये असे आवाहन केले जात असतानाही काही जण सर्रासपणे या आदेशाची पायमल्ली करताना दिसत आहेत. मात्र याच पार्श्वभूमीवर कल्याणातील एका नवविवाहीत जोडप्याने घरातल्या घरात विवाह सोहळा पार पाडत समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. रुपेश भास्कर जाधव आणि प्रियांका जाधव अशी या नववधू वरांची नावे आहेत.

रुपेश हा कल्याण कोर्टात वकिली करत आहे तर प्रियांका एका मोठ्या कंपनीत कामाला आहे. जगात फोफावणार्‍या करोनाने सर्वत्रच अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. महाराष्ट्रातही करोनाचे रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्य सरकारकडून खबरदारी घेण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. शक्यतो गर्दी होईल अशा कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये अशा स्पट सुचना दिल्या आहेत. विवाह समारंभ पुढे ढकलण्याच्याही सुचना किंवा साधेपणाने साजरे करण्याचे आवाहनही राज्य शासनाकडून करण्यात आले आहे. करोनाच्या रूग्ण वाढत असल्याने अत्यावश्यक सेवा वगळून दुकाने मॉल थिअटर आठवडी बाजार अशा अनेक गर्दीच्या ठिकांणावर निर्बंध घातले आहेत. मात्र अनेक ठिकाणी या आवाहनाला लोकांकडूनच हरताळ फासत भव्य-दिव्यतेने विवाह सोहळे साजरे झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

- Advertisement -

त्याच पार्श्वभूमीवर रूपेश आणि प्रियांका यांनी साधेपणाने व घरातल्या घरातच विवाह सोहळा करण्याचा निर्णय घेतला आणि शुक्रवारी त्यांनी प्रत्यक्षात अंमलातही आणला. विवाह सोहळयासाठी नातेवाईकांना न बोलावता नववधू वरांचे घरातील मंडळी उपस्थित होती. विशेष म्हणजे विवाह सोहळयाच्या वेळी नव वधुवरांनी तोंडाला मास्क बांधून आणि सॅनिटायजरने आपले हात स्वच्छ धुवून लग्नाचा विधी पार पाडीत समाजाला स्वच्छतेचा संदेश दिला. सामाजिक भान जपत पार पडलेला या विवाह सोहळयाचे नववधुवरांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे कौतुक होत आहे. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी खबरदारी म्हणून रूपेश आणि प्रियांकाच्या निर्णयाचे अनुकरण इतरांनीही करावे अशीच अपेक्षा व्यक्त होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -