घरमुंबईअंबरनाथमधील धोकादायक पोल तातडीने बदला

अंबरनाथमधील धोकादायक पोल तातडीने बदला

Subscribe

अंबरनाथ येथील धोकादायक पोल लवकरात लवकर बदला अशी मागणी भाजपा झोपडपट्टी सेलचे अंबरनाथ शहर सचिव व्ही. तंगराज नाडर यांनी अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

अंबरनाथ पश्चिमेकडील महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, मांगळेश्वर मंदिरा समोरील असणारे दोन विदयुत पोल हे धोकादायक अवस्थेत असून पोल हे पूर्णपणे गंजून गेलेले आहे. हे पोल केव्हाही पडून मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. याच पोलच्या परिसरात लोकवस्ती असल्याने याठिकाणी लहान मुले देखील खेळत असतात. तेव्हा महाराष्ट्र राज्य विदयुत वितरण कंपनी उपशाखा अंबरनाथ या विभागाने तातडीने लक्ष देऊन सदर पोल तातडीने बदली करून त्याठिकाणी नवीन पोल टाकण्यात यावे, अशी मागणी भाजपा झोपडपट्टी सेलचे अंबरनाथ शहर सचिव व्ही. तंगराज नाडर यांनी अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

पोल धोकादायक अवस्थेत

महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, मांगलेश्वर मंदिरा समोरील विदयुत विभागाचे असणारे पोल नंबर बीएस ४८ आणि ४९ हे दोन्ही पोल धोकादायक अवस्थेत असून पोल हे पूर्णपणे गंजून गेलेले आहे. सदर पोल हे केव्हाही पडून मोठी दुर्घटना किंवा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच पोलच्या परिसरात लोकवस्ती असल्याने याठिकाणी लहान मुले देखील खेळत असतात. तेव्हा महावितरणने तातडीने हे दोन्ही विदयुत पोल बदली करून त्याठिकाणी दुसरे नवीन पोल बसविण्यात यावे, अशी मागणी भाजपचे झोपडपट्टी सेलचे अंबरनाथ शहर सचिव व्ही. तंगराज नाडर यांनी अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांच्याकडे एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे. सदर पोल हे महावितरणने तातडीने बदली न केल्यास या ठिकाणी होणाऱ्या अपघातास आणि दुर्घटनेस महावितरण जबाबदार राहील, असेही तंगराज यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – जिल्ह्यातील २६७ इमारती धोकादायक !


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -