घरमुंबईमहाराष्ट्रात ५६ टक्के कोरोना लसींचे डोस वापरलेच नाहीत

महाराष्ट्रात ५६ टक्के कोरोना लसींचे डोस वापरलेच नाहीत

Subscribe

राज्यात कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे कोरोना नियंत्रणात आणायचा असेल तर लसीकरण हा पर्याय असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच लसीचे जास्तीचे डोस राज्यात पुरवले जावे या मागणीसाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांची भेट घेतली. मात्र, राज्याला पुरवण्यात आलेल्या लसीच्या डोसपैकी 56 टक्के डोस अद्यापही पडून असल्याचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे.

प्रकाश जावडेकर यांनी ट्विट करत म्हटले की, ‘महाराष्ट्रात 12 मार्चपर्यंत 52 लाख लसींचा पुरवठा करण्यात आला आहे. महाराष्ट्राला दिलेल्या 54 लाख लसींपैकी केवळ 23 लाख लसींचाच वापर झाला आहे. म्हणजेच महाराष्ट्रात 56 टक्के लसींचे डोस अजूनही पडून आहेत. आता शिवसेनेचे खासदार अधिकच्या लसीची मागणी करत आहेत. कोरोनाकाळात व्यवस्थेचा बोजवारा उडाला आणि लसीकरणासाठी योग्य व्यवस्थापन नसल्याचे दिसत आहे.”

- Advertisement -

महाराष्ट्रात अधिक लसींचा पुरवठा व्हायला हवा, असं प्रियंका चतुर्वेदी यांनी संसदेत म्हटलं. तर काल राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आज केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांची भेट घेतली. राज्यात एक कोटी 77 लाख लोकांना यामध्ये हेल्थ वर्कर, फ्रन्टलाईन वर्कस, 45 वर्षांवरील विविध आजारांनी ग्रस्त नागरिक यांना 2 कोटी 20 लाख लसीचे डोसेस पुढील तीन महिन्यात लागणार आहेत. सध्या रोज सव्वा लाख नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. मात्र आठवड्याला 20 लाख डोसेसची गरज आहे. त्यावेगाने कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन लस मिळावी अशी मागणी केंद्र सरकारकडे करणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली. केंद्र सरकार नक्की मदत करेल, असा विश्वासही राजेश टोपे यांनी व्यक्त केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -