घरमुंबईपालघर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या १४६.५३ टक्के पाऊस

पालघर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या १४६.५३ टक्के पाऊस

Subscribe

जिल्ह्यात गुरुवारी सकाळी संपलेल्या 24 तासांत सरासरी 7.59 मिमी पाऊस पडला असून जूनपासून आतापर्यंत एकूण 2397.45 मिमी पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंतच्या सरासरी पावसाशी त्याचे प्रमाण 146.53 टक्के इतके आहे.
यावर्षी आतापर्यंत वसई तालुक्यात 2228.22 मिमी, वाडा- 2925.81 डहाणू- 2028.20, पालघर- 2445.08, जव्हार- 2677.52, मोखाडा- 2558.90, तलासरी- 2072.73 आणि विक्रमगड तालुक्यात- 2502.77 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातील धामणी धरणाची आजची पाणी पातळी 116.75 मी. असून पाणीसाठा 251.656 दलघमी म्हणजेच 91.06 इतकी आहे.

कवडास उन्नैयी बंधार्‍याची पाणी पातळी 65.70 मी. तर पाणीसाठा 9.96 दलघमी असून हा बंधारा 100 टक्के भरला आहे. वांद्री मध्यम प्रकल्पाची पाणी पातळी 43.91 मी. असून पाणीसाठा 35.938 दलघमी इतका आहे. हे धरण देखील 100 टक्के भरले आहे. कुर्झे धरणाची पातळी 67.80 मी. तर पाणीसाठा 26.68 दलघमी म्हणजेच 68.32 टक्के इतका आहे. जिल्ह्यातील सूर्या नदीची (मासवण) पाणी पातळी 3.90 मीटर असून इशारा पातळी 11 आणि धोका पातळी 12.10 आहे. वैतरणा नदीची पातळी 101.48 मीटर तर इशारा पातळी 101.90 आणि धोका पातळी 102.10 आहे. पिंजाळ नदीची पातळी 102.51 असून इशारा पातळी 102.75 तर धोका पातळी 102.95 इतकी असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -