घरमुंबईराणीबागेतील प्राण्यांच्या पिंजर्‍यांकडे आदित्यने फिरवली पाठ

राणीबागेतील प्राण्यांच्या पिंजर्‍यांकडे आदित्यने फिरवली पाठ

Subscribe

महापौरांच्या हस्ते केले पिंजर्‍यांचे उद्घाटन

राणीबागेतील पेंग्विनसह राष्ट्ीय व आंतरराष्ट्ीय प्राण्यांसह प्राणिसंग्रहालयाचे नुतनीकरण करण्याची संकल्पना मांडणार्‍या शिवसेना नेते आणि युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी बुधवारी येथील प्राण्यांच्या पिंजर्‍यांच्या लोकार्पणासह विविध प्रकल्पांच्या उद्घाटनाकडे पाठ फिरवली. आदित्य ठाकरे यांनी फोट येथील सफाई कामगारांसाठी बांधण्यात येणार्‍या आश्रय योजनेअंतर्गत बांधलेल्या इमारतींचे चाव्या वाटप व इतर कार्यक्रमाला प्राधान्य दिले.

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयातील कांकर, सांबर, चितळ या प्राण्यांचे पिंजरे, प्राण्यांकरता किचन कॉम्प्लेक्स, वाघ,सिंह व बिबट्यांसाठी क्वारंटाईन क्षेत्र, मुंबईतील सर्वात मोठा गांडुळ खत प्रकल्प, नवीन थ्रीड सिनेमागृह आणि पब्लिक अँड्से सिस्टीम व सी.सी.टिव्ही कॅमेरा आदींचे लोकार्पण तसेच उद्घाटन महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्याहस्ते बुधवारी पार पडले. याचे लोकार्पण आदित्य ठाकरे यांच्याहस्ते होणार होते. दुपारी साडे बारा वाजता आयोजित केलेल्या या कार्यक्रमाची वेळ आदित्य ठाकरे यांच्यासाठी पुढे ढकलण्यात आली. परंतु अखेर आदित्य ठाकरे यांना येणे शक्य नसल्याने अखेर दुपारी अडीच वाजता महापौरांच्याहस्ते हा कार्यक्रम उरकून घेण्यात आला. तीन प्राण्यांच्या पिंजर्‍यांचे लोकार्पण केले जात असताना सेनेने महापालिका नेतेही उपस्थित नव्हते. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जर्‍हाड, उपायुक्त सुधीर नाईक, संचालक संजय त्रिपाटी आणि अनिल परांजपे आदी उपस्थित होते.निवडणूक येतील जातील, परंतु शिवसेना पक्ष मुंबईच्या विकासाच्याद्ष्टीने कामे करत राहिल, आणि त्यासाठी आम्ही बांधिल असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

फोर्ट येथील सफाई कामगारांच्या आश्रय योजनेतंर्गत बांधण्यात आलेल्या सदनिकांचे वाटप आणि कुलाब्यातील उपकरप्राप्त इमारतीच्या भूमिपुजनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी आदित्य ठाकरे याने राणीबागेकडे पाठ फिरवली आहे. निवडणुकीचा विचार करता आदित्यने राणीबाग ऐवजी मतांचा विचार करता हा निर्णय घेतल्याचे बोलले जाते.

बाराशिंगा आणि कोल्ह्याचेही पुढील आठवड्यात येणार
राणीबागेत चितळ, सांबर,आणि कांकर या प्राण्यांचे आगमन झाल्यानंतर आता पुढील आठवड्यात बाराशिंगा आणि कोल्ह्याचेही दर्शन मुंबईकरांना होणार आहे. या प्राण्यांसाठी नैसर्गिक वातावरणातील पिंजरे बनवले असल्याने पर्यटकांना काचेतून प्राण्यांचे दर्शन घेता येईल. त्यामुळे यापूर्वी प्राण्यांना खावू घालणे किंवा आतमध्ये दगड मारणे अशाप्रकारची कोणतीही कृती करता येणार नाही. बाराशिंगा आणि कोल्ह्यानंतर पुढील महिन्यात अस्वलाचेही दर्शन मुंबईकरांना घडणार असून यामुळे राणीबागेत येणारे आनंदीत होवूनच माघारी परतणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -