घरमनोरंजन९८ व्या नाट्य संमेलनाला आजपासून प्रारंभ! सलग ६० तास रंगणार सोहळा

९८ व्या नाट्य संमेलनाला आजपासून प्रारंभ! सलग ६० तास रंगणार सोहळा

Subscribe

अखिल भारतीय नाट्य संमेलनाची सुरुवात आज संध्याकाळी ४  वाजता नाट्य दिंडीने होणार आहे. नाट्यसंमेलनाचे हे ९८ वे वर्ष असून मुलुंड येथील कालिदास नाट्यमंदिरात हा द्विदिवसीय सोहळा रंगणार आहे. नाट्य दिंडीने संमेलनाचा प्रारंभ झाल्यानंतर संध्याकाळी साडेसहा वाजता ज्येष्ठ रंगकर्मी सतीश आळेकर यांच्या हस्ते नाट्य संमेलनाचे उद्घाटन होईल. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि जयंत सावरकर उपस्थित राहणार आहेत. रात्री ९ वाजता ‘संगीत सौभद्र’ या संगीत नाटकाचा प्रयोग सादर होईल. जाणून घेऊया, दोन दिवस चालणाऱ्या या नाट्यसंमेलनातील कार्यक्रमांची रुपरेषा.

प्रेक्षकांसाठी बहुरंगी कार्यक्रमांचा खजिना

१४ जून
  • १३ जूनच्या मध्यरात्री १२:३० वाजता ‘पंचरंगी पठ्ठेबापूराव’ आणि दिवंगत लावणीसम्राज्ञी यमुनाबाई वाईकर यांना समर्पित असणारा ‘रंगबाजी’ हा कार्यक्रम सादर होणार आहे.
  • १४ जून रोजी पहाटे ६ वाजता ‘प्रात:स्वर’ सत्रामध्ये राहुल देशपांडे आणि आनंद भाटे यांच्या शास्त्रीय गायनाचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे.
  • पुढील सत्रांमध्ये ‘तेलेजू-बालनाट्य’, ‘जंबा बंबा बू’, ‘इतिहास गवाह है’ असे नाटकांचे प्रयोग आणि ‘तुका म्हणे’ ही नृत्यनाटिका पाहायला मिळणार आहे.
  • त्याचदिवशी संध्याकाळी ६ वाजता गो. ब. देवल पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये संमेलनाच्या अध्यक्षा कीर्ती शिलेदार यांची मुलाखत आणि त्यांचे सादरीकरण होणार आहे.
  • रात्री ९ वाजता दिवसाच्या शेवटच्या सत्रात ‘संगीतबारी’ कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमानंतर त्यादिवसाची सांगता होईल.
१५ जून
  • नाट्य संमेलनाच्या दुसऱ्या आणि शेवटच्या दिवशी म्हणजेच १५ जून रोजीही रसिकांसाठी विविध कार्यक्रमांची मेजवानी असणार आहे.
  • १४ जूनच्या मध्यरात्री १२:३० वाजता लोककला जागर हा कार्यक्रम सादर होणार आहे.
  • १५ जून रोजी सकाळी 6 वाजता प्रात:स्वर कार्यक्रमामध्ये मंजुषा पाटील आणि सावनी शेंडे यांचा शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम होईल.
  • त्यानंतर अनुक्रमे ‘साडेसहा रुपयांचे काय केलेस’, ‘चित्र-विचित्र’ या एकांकिका आणि ‘शिकस्त-ए-इश्क’ या प्रायोगिक नाटकांचे प्रयोग होतील.दुपारी ३ वाजता ‘अपूर्व मेघदूत’ हा नाट्य प्रयोग होईल तर सायंकाळी ५:३० वाजता खुले अधिवेशन आणि समारोपाचा कार्यक्रम पार पडेल.
  • समारोपानंतरही रात्री ९ वाजता संगीत रंगभूमीचा प्रवास उलगडणारा ‘रंगयात्रा’ कार्यक्रम होणार आहे.
  • तर मध्यरात्री १२:३० वाजता ‘सुखन’ या नाट्य प्रयोगाचे सादरीकरण होणार आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -