घरमुंबईभारतातील सर्वात मोठा पॉप कल्चर सोहळा मुंबईत

भारतातील सर्वात मोठा पॉप कल्चर सोहळा मुंबईत

Subscribe

देशातील सर्वात मोठ्या पॉप कल्चर सोहळ्याचे बॉम्बे एक्झिबिशन सेंटरमध्ये आयोजन करण्यात आले आहे. ‘मुंबई कॉमिक कॉन’ २२-२३ डिसेंबर रोजी होणार आहे.

भारतातील सर्वात मोठा पॉप कल्चर सोहळा मुंबई कॉमिक कॉन २२ आणि २३ डिसेंबर रोजी सकाळी ११ ते रात्री ८ या वेळेत बॉम्बे एक्झिबिशन सेंटर, नेस्को, गोरेगाव येथे रंगणार आहे. पॉप कल्चर आणि फॅन्टास्टिशी निगडीत सर्व वस्तूंनी आणि ठासून भरलेल्या कार्यक्रमांनी सज्ज मुंबई कॉमिक कॉन उपस्थितांना कॉमिक्स आणि ग्राफिक्सचा अद्भुत साठा न्याहाळायला मिळेल. यात केवळ लोकप्रिय नावे आणि मालिकाच नाहीत, तर अत्यंत प्रतिभावान अशा स्वतंत्र कलाकारांच्या व लेखकांच्या उत्कृष्ट कलाकृतीदेखील असतील. शिवाय चाहत्यांना खास अशा अनुभवात्मक आणि गेमिंग झोन्सचा,त्यांच्या आवडत्या ब्रॅंडच्या छान छान वस्तू आणि खेळणी यांचाही आनंद घेता येईल.

नामवंत कलाकारांचा समावेश

मुंबई कॉमिक कॉन २०१८ मधील विशेष अतिथींमध्ये देश विदेशातील कॉमिक आणि मनोरंजन क्षेत्रातील नामवंत कलाकारांचा समावेश असेल. या समारंभात सना ताकिडा (मॉन्स्ट्रेस या फॅंटसी मालिकेसाठी प्रसिद्ध कलाकार) आणि याया हान (व्यावसायिक कॉस्प्लेअर) आणि विल कॉनरॅड (मार्व्हेल आणि डीसी कॉमिक्सचा कलाकार) तसेच भारतीय प्रकाशन वर्तुळातील लोकप्रिय कॉमिक बुक कलाकार विवेक गोयल, सौमिन पटेल, अभिजीत किणी, एलिसिया सूझा, राहील मोहसीन आणि अनिरुद्धो चक्रवर्ती व इतर उपस्थित असतील. यामध्ये विनोदाचा आनंद सामील करण्यासाठी लोकप्रिय स्टँडअप कॉमेडियन आणि ईस्ट इंडिया कॉमेडीचा सह-संस्थापक साहिल शाह अॅक्ट सादर करेल तर, रॉक ऑन आणि सॅकरेड गेम्ससाठी ओळखला जाणारा लुक केनी याचे एक रंजक सत्र मुंबई कॉमिक कॉन मध्ये असेल.

- Advertisement -

“पॉप कल्चर चाहत्यांसाठी आणि या शहरातील उत्साही लोकांसाठी हा वीकएंड वर्षातला सर्वात मस्त वीकएंड असेल. दर वर्षीप्रमाणे,यंदाही या इव्हेंटमध्येखूप जबरदस्त अनुभव, अॅक्टीव्हिटीज आणि या उद्योगातील उत्तमोत्तम कलाकारांशी चर्चा, गप्पा अशा कार्यक्रमांची रेलचेल आहे. शिवाय कॉमिक बुक्सच्या अद्भुत विश्वाशी निगडीत असलेले मोठमोठे कलाकार, चित्रकार, लेखक आणि प्रकाशक यांच्याशी मनमोकळ्या गप्पा आणि पॅनल चर्चा देखील यात असणार आहे.” – कॉमिक कॉन इंडियाचे संस्थापक, जतिन वर्मा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -