घरताज्या घडामोडीठाण्यातील चोरीच्या घटनांचा तपास कासवगतीने; ठाणेकरांची सुरक्षा रामभरोसे

ठाण्यातील चोरीच्या घटनांचा तपास कासवगतीने; ठाणेकरांची सुरक्षा रामभरोसे

Subscribe

ठाणे जिल्ह्यातील वाढत्या चोऱ्या आणि घरफोडींमुळे ठाणेकरांमध्ये भितीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

ठाणे जिल्ह्यातील वाढत्या चोऱ्या आणि घरफोडींमुळे ठाणेकरांमध्ये भितीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तरीही पोलीस प्रशासन कासवगतीने चोरीच्या घटनांची उकल करत असल्याचे समोर आले आहे. काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी विधानपरिषदेत यासंबंधी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्याला गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लेखी उत्तर दिले. त्यामधून चोरीच्या घटनांची आणि उकल झालेल्या गुन्ह्यांची आकडेवारी समोर आली आहे.

ठाणेकरांची सुरक्षा रामभरोसे

वर्ष २०१९ मध्ये ठाणे जिल्ह्यात चोरीचे एकूण ३ हजार ५७८ गुन्हे घडले आहेत. त्यापैकी १ हजार २७१ गुन्हे उघड झाले आहेत. तर घरफोडीच्या १ हजार २७८ घटना घडल्या असून त्यापैकी फक्त ५०१ घटना उघड झाल्या आहेत. दोन्ही प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये अर्ध्याहून अधिक चोरीच्या प्रकरणांची उकल झालेली नसल्याचे गृहमंत्र्यांच्या लेखी उत्तरातून समोर आले आहे. चोरी आणि घरफोडीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी दिवसा आणि रात्री पायी गस्त, मोटार सायकल आणि जी/लाईट व्हॅन अशा प्रकारे गस्त करण्यात येत आहे. तसेच नाकाबंदी, कोम्बिंग ऑपरेशनची योजना राबविली जात आहे. संशयित गुन्हेगरांच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे, अशा उपाययोजना राबवत असल्याचे गृहमंत्र्यांनी उत्तरात सांगितले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – धक्कादायक! रेल्वेत चोरी करणारे ८५ टक्के चोर मोकाट


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -