घरताज्या घडामोडीडोंबिवली एमआयडीसीतील ३८ कंपन्यांवर खटले; सेफ्टी ऑडिटमध्ये ठेवला ठपका

डोंबिवली एमआयडीसीतील ३८ कंपन्यांवर खटले; सेफ्टी ऑडिटमध्ये ठेवला ठपका

Subscribe

डोंबिवली एमआयडीसीतील कंपन्यांच्या करण्यात आलेल्या सेफ्टी ऑडिटमध्ये नियमभंग करण्यात आल्याने आतापर्यंत एकूण ३८ कंपन्यांविरोधात ठपका ठेवण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.

डोंबिवली एमआयडीसीमधील एकूण कंपन्यांच्या करण्यात आलेल्या सेफ्टी ऑडिटमध्ये नियमभंग करण्यात आल्याने आतापर्यंत एकूण ३८ कंपन्यांविरोधात ठपका ठेवण्यात आला आहे. या कंपन्यांविरोधात ठाण्यातील मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात खटले दाखल करण्यात आले, असल्याची माहिती राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत दिलेल्या लेखी उत्तरात दिली. डोंबिवलीतील महाराष्ट्र औद्यगिक विकास महामंडळामध्ये सुरक्षेच्या परिक्षणाशिवाय कारखाने सुरु असल्याबाबत आमदार कुमार आयलानी आणि प्रमोद पाटील यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात ही माहिती पुढे आली आहे. महाराष्ट्र औद्यगिक विकास महामंडळात ३४१ कारखाने असून डोंबविली औद्यगिक परिसरामध्ये गेल्या तीन वर्षांत १८ दुर्घटना घडल्या आहेत. ज्यात २१ जणांचे मृत्यू झाले आहेत. त्यातच या कारखान्यातून बाहेर सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यामुळे प्रदुषण होत असल्याबाबत हा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यावेळी हे उत्तर देण्यात आले.

तीन वर्षांत आगीच्या ६ घटना

उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिलेल्या लेखी उत्तरात नमूद केले की, डोंबिवलीतील एमआयडीसीत गेल्या तीन वर्षांत आगीच्या ६ घटना, स्फोटाच्या ३, वायुगळतीची १ आणि इतर ९ अशा एकूण १९ दुर्घटना घडून त्यामध्ये ८ जणांचा मृत्यू झाला आहे. या परिसरातील एकूण ११६ कारखान्यांचे सेफ्टी ऑडिट बाह्यसुरक्षा लेखा परिक्षकांकडून करण्यात आले आहे. तसेच उर्वारित कारखान्यांना सेफ्टी ऑडिट करुन घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियत्रंण मंडळ यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार, कारखान्यातून सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यामुळे जल प्रदूषित होत असल्याचे आढळून आलेले नाही. त्याचप्रमाणे प्रोबेस कंपनीबाबतच्या चौकशी अहवालामधील शिफारशीच्या अनुषंगाने विभाग निहाय शासन स्तरावर कार्यवाही सुरु आहे. कारखान्यांचे मालक आणि अधिकारी यांच्याबाबत कोणत्याही तक्रारी औद्यगिक सुरक्षा आणि आरोग्य संचालनालयाकडे प्राप्त झालेल्या नाहीत, असेही त्यांनी यावेळी लेखी उत्तरात अधोरेखित केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – अखेर मराठा आंदोलन, कोरेगाव-भिमा आंदोलनातील गुन्हे मागे!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -