घरताज्या घडामोडी'त्या' विदेशी प्रवाशांना आणखीन ७ दिवस क्वारंटाईन होणे बंधनकारक

‘त्या’ विदेशी प्रवाशांना आणखीन ७ दिवस क्वारंटाईन होणे बंधनकारक

Subscribe

मुंबईत युके, मिडल इस्ट आणि युरोप या देशांतून येणाऱ्या प्रवाशांना कोरोनासंबंधित चाचणी अहवाल ७ दिवसांनी निगेटिव्ह आल्यानंतरही घरात ७ दिवस क्वारंटाईन होणे बंधनकारक असणार आहे, असे फर्मान महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी काढले आहे. यासंदर्भातील परिपत्रक आयुक्तांनी जारी केले आहे. विविध देशांच्या दुतावासात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना ‘वंदे भारत मिशन’ अंतर्गत मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक असेल, असे आयुक्तांनी परिपत्रकात स्पष्ट केले आहे.

विदेशामधून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांची कडक तपासणी

ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवीन प्रकार समोर आल्यामुळे केंद्र सरकार, राज्य सरकार आणि मुंबई महापालिका अलर्ट झाले आहेत. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी आणि कोरोनाला हद्दपार करण्यासाठी मुंबई महापालिका विविध उपाययोजना करीत आहे. मुंबईत कोरोनाच्या नवीन प्रकारच्या विषाणूचा शिरकाव होऊ नये यासाठी पालिकेने कडक पावले उचलली आहेत. विदेशामधून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांची कडक तपासणी करण्यात येत आहे. युके, मिडल इस्ट आणि युरोप या देशांतून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना ७ दिवस क्वारंटाईन केले जात आहे. त्यानंतर कोरोनाची आरटीपीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली असून चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला तरीही पुढील ७ दिवस घरातच क्वारंटाईन रहाणे बंधनकारक करण्यात आले आहे. विविध देशांच्या दुतावासात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना वंदे भारत मिशन अंतर्गत मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक असेल असे आयुक्तांनी परिपत्रकात स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

राज्य सरकारने इंग्लड येथून मुंबईत येणाऱ्या विमानाची सेवा २३ डिसेंबरपासून रद्द केली आहे. तसेच युके, साऊथ आफ्रिका, आखाती देश आणि युरोपियन देशातून येणाऱ्या प्रवाशांना विमानतळावर दाखल झाल्यानंतर मुंबईतील विविध हॉटेलमध्ये क्वारंटाईन करण्यात येणार आहे. विदेशातून आलेल्या एखाद्या प्रवाशामध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आल्यास आणि त्याचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास त्यास पुढील उपचारासाठी सेव्हन हिल्स आणि जीटी रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. मात्र एखाद्या प्रवाशाचा कोरोना चाचणी अहवाल ७ दिवसांनी निगेटिव्ह आला तरी पुढील ७ दिवस त्यास होम क्वारंटाईन होणे बंधनकारक करण्यात आले आहे.


हेही वाचा – Live Update: मुंबईत मागील २४ तासांत आढळले ५७८ नवे रुग्ण, ८ जणांचा मृत्यू!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -