घरCORONA UPDATEअंधारात पाप करायची संधी देऊ नका -जितेंद्र आव्हाड

अंधारात पाप करायची संधी देऊ नका -जितेंद्र आव्हाड

Subscribe

सध्या राज्यासह देशात करोनाचे संकट असून, या संकटाचा समान देशातील सर्वच जनता करत आहे. त्यामुळे थाळी, घंटा नाद यांच्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ५ एप्रिलला रात्री नऊ वाजता घरातील सर्व लाईट बंद करा आणि हातात मेणबत्ती किंवा मोबाईल टॉर्च घेऊन आपापल्या गॅलरीत उभे रहा असे आवाहन केले आहे. मात्र आता त्यावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले असून, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँगेस कडून मोदींवर टीका होत आहे. आता तर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अंधारात पापं करायची संधी देऊ नका. दान हे पुण्य आहे. ते उजेडात करा असे आवाहन महाराष्ट्रातील जनतेला केलं आहे.

नेमकं काय म्हणालेत आव्हाड?

येत्या पाच तारखेला रात्री ९ वाजता लाईट घालवा आणि दिवे लावा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पण आमचं म्हणणं वेगळं आहे. लाईट घालवून दिवे लावण्यात वेळ घालवू नका. उलट त्याक्षणी असतील त्या सगळ्या लाईट्स लावा. घरातल्या, दारातल्या, गॅलरी आणि बाल्कनीतल्या, गच्चीतल्या आणि सोसायटीतल्या, सगळ्या लाईट्स लावा असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. तसेच जे लाखो डॉक्टर्स, नर्स, वोर्डबॉय, पोलीस, सफाई कामगार, पाणी पुरवठा, वीज पुरवठा या सगळीकडे काम करणारे लोक आहेत त्यांच्या समर्थनासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये फक्त १०१ रुपये द्या. फक्त १०१ रुपये. अन त्याचा स्टेट्स आपल्या व्हाॅट्सॲप, फेसबुकवर अभिमानाने ठेवा असे आवाहन देखील आव्हाड यांनी यावेळी केली.

- Advertisement -

भाजपवर साधला निशाणा

दरम्यान, यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी अप्रत्यक्षपणे भाजपवर निशाणा साधत ‘लक्षात ठेवा. अंधारात कधीही चांगली कामं होत नाहीत. उजेडात होते पुण्य, अंधारात पाप. तेव्हा अंधार करू नका. अंधारात पाप करायची संधी देऊ नका. दान हे पुण्य आहे. ते उजेडात करा’, असे आवाहन जनतेला केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -