घरमुंबईजेएनयुचा वाद मुंबईत पोहोचला

जेएनयुचा वाद मुंबईत पोहोचला

Subscribe

मुंबई विद्यापीठाच्या गेट बाहेर विद्यार्थ्यांनी केले आंदोलन

दिल्लीतील जेएनयु विद्यापीठात विद्यार्थ्यांवर जालेल्या पोलिसांच्या कारवाईला विरोध करण्यासाठी बुधवारी मुंबईतील विविध कॉलेजतील विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन मुंबई विद्यापीठाच्या गेट बाहेर आंदोलन केले. यावेळी आयआयटी मद्रासमध्ये फातीमा लतिफ आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी विद्यार्थ्यांच्यावतीने करण्यात आली. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांची मोठी संख्या यावेळी पाहाव्यास मिळाली. त्याचप्रमाणे मोठ्याप्रमाणात उच्च शिक्षित वगार्तील नागरीक यावेळी उपस्थित होते.

परवडणार्‍या दरात शिक्षणाची मागणी करणार्‍या दिल्लीतील जेएनयु विद्यार्थ्यांवर पोलिसांनी जोरदार लाठीचार्ज करुन त्यांचे आंदोलन चिघळण्याचे प्रयत्न गेल्या काहि दिवसापासून सुरु आहे. मात्र विद्यार्थ्यांनी शुल्क वाढाला विरोध करण्यासाठी आपले आंदोलन सुरुच ठेवले आहे. या आंदोलनाचे पडसाद देशभरातील विद्यापीठांमध्ये पाहाव्यास मिळत आहे. त्यामुळे केंद्र सरकारची कोंडी जाल्याचे चित्र देशात निमार्ण झाले आहे. जेएनयुमधील विद्यार्थ्यांच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी आणि जातीवादी शक्ती विरोधात आवाज उठविण्यासाठी मुंबई विद्यापीठा बाहेर बुधवारी धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मुंबईतील महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्याप्रमाणात जमले होते. आयआयटी मद्रासमधील एका विद्याथीर्नीला ती अल्पसंख्याक असल्यामुळे मानसिक त्रास प्रशासनाच्यावतीने आणि विद्यार्थ्यांच्यावतीने देण्यात आले असल्याचे आरोप यावेळी विद्यार्थ्यांवतीने करण्यात आले असून फातिमा लतिफ आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी यावेळी विद्यार्थ्यांनी केली.

- Advertisement -

जेएनयु विद्यापीठात मागासवर्गीय विद्यार्थ्यांना कमी पैशात चांगले शिक्षण मिळत असून मागासवर्गीयांना दजेर्दार शिक्षण मिळू नये यासाठी विद्यापीठकडून शुल्क वाढ करण्यात येत असल्याचे आरोप स्टुडंट इस्लामिक संघटनेचे रफिद साहेब यांनी केले. फातिमा लतिफ आत्महत्या प्रकरणातील दोषी व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी यावेळी एसआयओ संघटनेच्यावतीने करण्यात आली. हे आंदोलन जॉईंट अ‍ॅक्शन कमिटी फॉर सोशल जस्टीस या संघटनेच्यावतीने आयोजित करण्यात आले होते. या आंदोलनाला समता विद्यार्थी आघाडी, समयाक विद्यार्थी आंदोलन, विद्यार्थी भारती, छात्र भारती आणि भारत बचाओ आंदोलन या संघटना सहभागी झाल्या होत्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -