घरमुंबईजोगेश्वरी येथून घातक शस्त्रांसह सराईत आरोपीस अटक

जोगेश्वरी येथून घातक शस्त्रांसह सराईत आरोपीस अटक

Subscribe

जोगेश्वरी येथून घातक शस्त्रांसह एका सराईत आरोपीस ओशिवरा पोलिसांनी अटक केली. शोएब अब्दुल सलाम खान ऊर्फ डंकर असे या आरोपीचे नाव असून त्याच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात सतराहून अधिक घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले. अटकेनंतर त्याला मंगळवारी अंधेरीतील स्थानिक न्यायालयाने 26 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

जोगेश्वरी येथे काही तरुण घातक शस्त्रांसह येणार असल्याची माहिती ओशिवरा पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलीस पथकाने न्यू लिंक रोडवरील आनंदनगर, मेगा मॉलजवळ साध्या वेशात पाळत ठेवली होती. सोमवारी तिथे शोएब खान हा आला होता. त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असता त्याच्याकडे पोलिसांना एक गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतुस सापडले.

- Advertisement -

शोएब हा मालवणी परिसरात राहत असून तो सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध अंधेरी, आंबोली आणि ओशिवरा पोलीस ठाण्यात सतराहून अधिक घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. यातील काही गुन्ह्यांत त्याला पोलिसांनी अटक केली होती. सध्या तो जामिनावर होता. जामिनावर आल्यानंतर त्याने पुन्हा घरफोडी करण्यास सुरुवात केली होती. अलीकडेच त्याने जोगेश्वरी परिसरात तीन ते चार फ्लॅटमध्ये घरफोडी केली होती. या गुन्ह्यात त्याच्या एका मित्राला पोलिसांनी अटक केली आहे .

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -