घरमुंबईवाहतूक विभागाची संयुक्त मोहीम "अडगळीत"

वाहतूक विभागाची संयुक्त मोहीम “अडगळीत”

Subscribe

रस्त्यावरील बेवारस गाड्या उचलण्यात पालिका अपयशी

ठाणे पालिकेच्या माध्यमातून ठाण्याच्या विविध भागांत मोठ्या प्रमाणात रस्ता रुंदीकरण, मोकळे फुटपाथ अशा मोहीम राबवून रस्ते आणि फुटपाथ मोकळे केले. मात्र, या रिकाम्या अतिरिक्त जागेचा ताबा बेवारस भंगार गाड्यांनी घेतल्याचे चित्र दिसत आहे. तर दुसरीकडे ठाणे महानगर पालिका आणि वाहतूक विभागाच्या माध्यमातून बेवारस गाड्या उचल्याची मोहीम सुरू करण्यात आली. नागरिकांनीही बेवारस भंगार गाड्यांची माहिती दिली. मात्र ही संयुक्तिक मोहीम अडगळित गेल्याची चर्चा आहे.

ठाणे महानगर पालिकेला अनेक पुरस्कार मिळवल्यानंतर आता ’स्वच्छ भारत सर्वेक्षण 2020’ मध्ये ठाणे मुंबई महानगरपालिकेने उत्तीर्ण होण्यासाठी कंबर कसली आहे. शहरात विविध ठिकाणी स्वच्छता सुरू असून मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येत आहे. मात्र, स्वच्छ भारत अभियानासमोर बेवारस भंगार वाहनांचा अडथळा येऊ लागला आहे. मुख्य व अंतर्गत रोडवर तसेच पार्किंगमध्ये शेकडो भंगार वाहने धूळ खात पडली आहेत. या मोहिमेत नागरिकांनी सूचना करण्याचे आवाहन आणि संकेतस्थळी प्रसिद्ध करण्यात आले. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात माहितीही पुरविली. मात्र मोहिमच थंडावल्याने गाड्या बेवारस पडलेल्या दिसत आहे. ठाण्याच्या रस्तारुंदीकरणात मोकळे केलेले रस्ते आज पार्किंग आणि भंगार गाड्यांनी व्यापलेले आहेत. याचा वाहतुकीला मोठा अडथळा होतो. मात्र कारवाई करणार कोण? असा यक्ष प्रश्न नागरिक आणि तक्रारदारांसमोर उभा आहे. ठाण्याच्या वागळे इस्टेट येथे रोड क्रमांक 16, 33, 22 या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बेवारस गाड्या रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असल्याचे चित्र आहे.

- Advertisement -

शहरात मोठ्या प्रमाणावर बेवारस वाहने उभी आहेत, यामुळे स्वच्छ सर्वेक्षणासाठी अडथळा निर्माण होत असून शहर विद्रुप होत आहे. वाहने दूर करण्याची संपूर्ण जबाबदारी वाहतूक विभागाची असून वाहतूक विभागाने आराखडा तयार करण्यात यावा. महापालिका हवा तो मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री देण्यास तयार आहे. – शंकर पाटोळे ( सहाय्यक आयुक्त )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -