घरमुंबईगणेशोत्सवपूर्वी कल्याण-बदलापूर रस्ता खड्डेमुक्त करा

गणेशोत्सवपूर्वी कल्याण-बदलापूर रस्ता खड्डेमुक्त करा

Subscribe

अंबरनाथ तहसील कार्यालयावर मोर्चा

अंबरनाथ नगर परिषद हद्दीतील दुरवस्था झालेल्या कल्याण-बदलापूर रस्त्याची गणेशोत्सवापूर्वी दुरुस्ती करावी, तसेच अपघातग्रस्तांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी सुमेध भवार युथ फाउंडेशनने अंबरनाथ तहसील कार्यालयावर शुक्रवारी मोर्चा काढला.

फाउंडेशनचे अध्यक्ष सुमेध भवार यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी हा मोर्चा काढण्यात आला. भाजपा महिला शहर अध्यक्ष सुजाता भोईर तसेच युथ फाउंडेशनचे पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते. अंबरनाथ नगर परिषद हद्दीतील साईबाबा मंदिर ते फॉरेस्ट नाका या कल्याण बदलापूर राज्य मार्गावर एमएमआरडीएकडून 2012 साली हाती घेण्यात आलेले रस्ता रूंदीकरण आणि काँक्रीटीकरणाचे काम आजतागायत पूर्ण झालेले नाही. या रस्त्यावर खड्ड्यांमुळे तसेच सदोष रस्ते बांधणीमुळे अपघातात गेल्या दहा वर्षात 185 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर 427 जण जखमी झाले आहेत.

- Advertisement -

या रस्त्याच्या कामात प्रशासकीय दिरंगाई हेच प्रमुख कारण असून त्याचा फटका सर्वसामान्य पादचारी आणि वाहनचालकांना बसला आहे. त्यामुळे हा मोर्चा काढल्याचे तसेच राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून तहसीलदारांना अपघातग्रस्तांना नुकसान भरपाईची मागणी करणारे निवेदन देण्यात आल्याचे सुमेध भवार यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -