घरमुंबईहि तर शिवसेनेच्या विनाशाची सुरुवात - कंगना रणौत

हि तर शिवसेनेच्या विनाशाची सुरुवात – कंगना रणौत

Subscribe

कंगनाच्या ऑफिसमध्ये अवैध बांधकाम

मुंबईचे नवे पोलीस आयुक्तपदी हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर पमबीर सिंह यांची मुंबई पोलीस आयुक्तपादावरुन उचलबांगडी करुन त्यांना गृह रक्षक दलाची जबाबदारी देण्यात आली आहे. हेमंत नगराळे यांच्याकडे सध्या राज्याच्या पदाची प्रभारी जाबाबदारी दिली होती. राज्यात घडणाऱ्या घडामोडींवर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आपले मत व्यक्त करत असते. यावेळीही कंगना रणौतने अधिकाऱ्यांच्या बदल्यांवर आपले मत व्यक्त करत ही तर शिवसेनेच्या विनाशाची सुरुवात असल्याचे म्हटले आहे. कंगना रणौतने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ट्विट करत मुंबई आयुक्तांची बदली ही तर शिवसेनेच्या विनाशाची सुरुवात आहे. कंगना रणौतने म्हटले आहे.

कंगना रणौतने ट्विट करत म्हटले आहे की, ही तिच व्यक्ती आहे. ज्यांनी मुंबईच्या रस्त्यावर माझ्याविरोधात चुकीच्या गोष्टींना प्रोस्ताहन दिले. यावर जेव्हा मी पलटवार केला त्यानंतर सोनिया सेनेने त्यांचा बचाव केला आणि बदला घेण्यासाठी माझे घराची तोडफोड केली होती. परंतु आज त्याच शिवसेनेने त्यांना बाहेर काढले आहे. हा शिवसेनेच्या विनाशाची सुरुवात आहे. असे कंगनाने म्हटले आहे.

- Advertisement -

प्रख्यात उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटक प्रकरणामध्ये ठाकरे सरकारने परमवीर सिंह यांची बदली केली आहे. परमवीर सिंह यांची बदली त्यांचे डिमोशन असल्याचे बोलले जात आहे. मुंबईच्या पाली हिल येथील कंगना रणौतच्या ऑफीसवर हातोडा चालवण्यात आला होता. हे प्रकरण चांगलेच चर्चेत राहिले होते. कंगानचे महाराष्ट्र सरकारसोबत वाकयुद्ध सुरु होते. त्यामुळे कंगनाच्या ऑफिसमध्ये अवैध बांधकाम झाले असल्याचा ठपका ठेवत ऑफिसचा काही भाग तोडण्यात आला होता.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -