घरताज्या घडामोडीसोमय्यांना झालयं काय? नोटीस कोरोना नियम उल्लंघन केल्याबदद्ल अन् सांगताहेत दुसरचं ...

सोमय्यांना झालयं काय? नोटीस कोरोना नियम उल्लंघन केल्याबदद्ल अन् सांगताहेत दुसरचं …

Subscribe

सोमय्या यांनी त्यांना सांताक्रुझ पोलिसांनी नोटीस बजावल्याचे टि्वट केले. पण नोटीशीचे कारण मात्र भलतेच सांगितले.

शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये सुरू असलेले आरोपसत्र सुरूच असून आज भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला लक्ष्य केलं. यावेळी सोमय्या यांनी त्यांना सांताक्रुझ पोलिसांनी नोटीस बजावल्याचे टि्वट केले. पण नोटीशीचे कारण मात्र भलतेच सांगितले. यामुळे सोशल मीडियावर सोमय्या यांच्यावर टीका होत आहे.

- Advertisement -

सोमय्या यांना सांताक्रूझ पोलिसांची नोटीस आली हे खरे आहे. मात्र ही नोटीस त्यांना कलम 188 अंतर्गत कोरोना नियमांचे उल्लंगन केल्याप्रकरणी बजावण्यात आली आहे. त्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच 15 दिवसात पोलीस ठाण्यात हजर राहून स्पष्टीकरण द्या अन्यथा कारवाई केली जाईल असे या नोटीशीत सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

पण असे असताना सोमय्या यांनी मात्र ही नोटीस छगन भुजबळ यांच्या सांताक्रुझमधील बेनामी प्रॉपर्टीची पाहणी केल्याबद्दल पाठवण्याचे टि्वट मध्ये म्हटले आहे. यामुळे नेटकऱ्यांनी सोमय्या यांना ट्रोल केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -