घरमुंबईKirit Somaiya : रवींद्र वायकर प्रकरणी ईडीने इकबाल चहल यांचीही चौकशी करावी;...

Kirit Somaiya : रवींद्र वायकर प्रकरणी ईडीने इकबाल चहल यांचीही चौकशी करावी; सोमय्यांची मागणी

Subscribe

मुंबई : शिवसेना (Shiv Sena) उद्धव बाळासाहेब (Uddhav Balasaheb Thackeray) ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे निकटवर्ती समजले जाणारे आमदार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांच्याविरुद्ध काही दिवसांपूर्वीच ईडीने कारवाईचा फास आवळला आहे. सध्या त्यांची ईडी चौकशी सुरू आहे. अशातच भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी रवींद्र वायकर प्रकरणी ईडीने इकबाल चहल याची चौकशी करावी अशी मागणी केली आहे. (ED should also investigate Iqbal Chahal in Ravindra Waikar case Kirit Somaiya demand)

हेही वाचा – Suraj Chavan Arrested : किरीट सोमय्यांचा ठाकरे गटावर निशाणा; खिचडी घोटाळ्यासंदर्भात सर्वच सांगितलं

- Advertisement -

किरीट सोमय्या म्हणाले की, रवींद्र वायकर यांना ज्या पद्धतीने महापालिका कर्मचारी अधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे, त्यांची चौकशी झाली पाहिजे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्यावेळी महापालिका आयुक्त इकबाल चहल यांच्याकडे याप्रकरणी जाब विचारला तेव्हा त्यांनी पत्र लिहून रवींद्र वायकर यांना जुलै 2021 मध्ये परवानगी दिली होती, ती योग्य होती असं उत्तर दिले आहे. त्यामुळे ईडीने इकबाल चहल यांना याप्रकरणी विचारायला हवे. कुणाच्या सांगण्यावरून त्यांनी रवींद्र वायकर यांना परवानगी दिली, याची चौकशी व्हायला हवी. कारण त्यांना माहित होतं की, ही खेळाच्या मैदानांची जागा आहे, मात्र तरीसुद्धा परवानगी कुणाच्या दबावाखाली दिली गेली, याची चौकशी करण्याची मी मागणी केली आहे, अशी माहिती किरीट सोमय्या यांनी दिली.

हेही वाचा – Aaditya Thackeray : सूरज चव्हाण यांच्या अटकेनंतर आदित्य ठाकरेंची पोस्ट चर्चेत; ‘अशा देशभक्तांचा…’

- Advertisement -

ठाकरे सरकारकडून लोकांचे पुनर्वसन करण्याचा घोटाळा

धारावी येथील अपात्र झोपडपट्टी धारकांचे पुनर्वसन मुलुंड पूर्वेला करण्यासंदर्भात पत्र महाराष्ट्र सरकारच्या गृहनिर्माण मंत्रालयाने मुंबई महापालिकेला दिले आहे. या पत्रासंबंधात किरीट सोमय्या यांनी राज्य सरकार व झोपडपट्टी धारावी पुनर्विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून पत्र लिहिले आहे. तसेच एका ठिकाणी अशा 4 लाख लोकांचे पुनर्वसन अशक्य असल्याचे आपले मत त्यांनी व्यक्त केले आहे. याशिवाय ठाकरे गटावर आरोप करताना ते म्हणाले की, मुलुंड पूर्वेला इन्फ्रास्ट्रक्चरवर आधीच ठाकरे सरकारने पीएपी प्रकल्पाद्वारा 50,000 लोकांचे पुनर्वसन करण्याचा घोटाळा केला आहे. त्यात आता अधिक 4 लाख किंवा हजारो लोकांचे त्याठिकाणी पुनर्वसन करणे, हे मुलुंड पूर्वच्या नागरिकांवर अन्याय, अत्याचार होण्यासारखे आहे. धारावीची एकंदर लोकसंख्या 2.5 लाखांपर्यंत आहे. त्यात 4 लाख अपात्र लोक कसे काय? असा सवालही किरीट सोमय्या यांनी अधिकाऱ्यांना विचारला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -