घरमहाराष्ट्रRajan Salvi : अटक केली तरी ठाकरेंसोबतच राहणार म्हणणारे कोण आहेत राजन...

Rajan Salvi : अटक केली तरी ठाकरेंसोबतच राहणार म्हणणारे कोण आहेत राजन साळवी? वाचा सविस्तर…

Subscribe

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल शिंदे गटाच्या बाजुने लागल्यानंतर या निकालाचं विश्लेषण करणारी महापत्रकार परिषद उद्धव ठाकरेंनी 16 जानेवारी रोजी घेऊन शिंदे गटासह विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह भाजपवर जोरदार हल्ला केला. या महापत्रकार परिषदेनंतर आता खऱ्या अर्थाने राज्यातील राजकारणात उलाढाली सुरू झाल्या आहेत.

मुंबई : शिवसेनेतील बंडानंतर शिवसेना दोन गटात विभागल्या गेली. काहींनी मुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेत जाणं पसंत केलं तर अद्यापही अनेक निष्ठावंतानी उद्धव ठाकरेंसोबतच राहणं पसंत केलं. त्यातीलच एक म्हणजे ठाकरे गटाचे नेते राजन साळवी. राजापूरचे आमदार असलेले राजन साळवी यांच्या घरावर आज 18 जानेवारी रोजी एसीबीने छापेमारी केली. एसीबीच्या छाप्याबाबत बोलताना अटक केली तरी ठाकरेंसोबतच राहणार असे म्हणणारे कोण आहेत राजन साळवी? कशी राहिली त्यांची राजकीय कार्यकीर्द ? याबाबत सविस्तर माहिती देण्याचा हा प्रयत्न. (Rajan Salvi Who is Rajan Salvi who says he will stay with Thackeray even if arrested Read more)

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल शिंदे गटाच्या बाजुने लागल्यानंतर या निकालाचं विश्लेषण करणारी महापत्रकार परिषद उद्धव ठाकरेंनी 16 जानेवारी रोजी घेऊन शिंदे गटासह विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह भाजपवर जोरदार हल्ला केला. या महापत्रकार परिषदेनंतर आता खऱ्या अर्थाने राज्यातील राजकारणात उलाढाली सुरू झाल्या आहेत. यामधील एक घडामोड म्हणजे 17 जानेवारी रोजी रात्री उशिरा माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्ती म्हणून ओळख असलेले सूरज चव्हाण यांना खिचडी घोटाळ्याप्रकरणी अटक केली. या अटकेनंतर आज 18 जानेवारी रोजी सकाळी पावणे दहा वाजता ठाकरे गटाचे नेते राजन साळवी यांच्या घरावर एसीबीने छापेमारी केली. त्यानंतर आता पुन्हा प्रश्न निर्माण झाला आहे तो कोण आहेत राजन साळवी.

- Advertisement -

हेही वाचा : Sahara Group : 2.5 लाख छोट्या गुंतवणूकदारांना 241 कोटी रुपये केले परत; अमित शहांची माहिती

कोण आहेत राजन साळवी ?

राजन साळवी हे शिवसैनिक असून, ते 2009, 2014, 2019 असे सलग तीनवेळा ते राजपूरमधून शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आले आहेत. आमदार होण्याआधी विद्यार्थीसेनेपासून त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. राजन साळवी हे शिवसेनेचे रत्नागिरीतील पहिले नगराध्यक्ष राहिले आहेत. मुख्यमंत्री शिंदेंच्या बंडानंतरही ते उद्धव ठाकरे यांच्यासोबतच निष्ठेने राहिले आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Manipur Violence: मणिपूरमध्ये महिलांचा मुख्यमंत्र्यांविरोधात मशाल मोर्चा, सरकारकडे केली ‘ही’ मागणी

एसीबीच्या रेडमधून काय माहिती आली पुढे?

ठाकरे गटाचे नेते राजन साळवी यांच्या घरावर एसीबीने छापा टाकला. राजन साळवी यांच्या घरी, त्यांच्या भावाच्या घरी आणि हॉटेलवर एसीबीने छापा टाकला. साळवी यांच्या घरी सकाळपासून कसून चौकशी केली जात आहे. उत्पन्नापेक्षा 118 टक्के जास्त संपत्ती असल्याचा आरोप साळवी यांच्यावर आहे. याच प्रकरणी त्यांची चौकशी सुरु आहे. याआधीही सहा वेळा साळवी यांची चौकशी झाली आहे. तर आज एसीबी त्यांच्या घरी चौकशी करत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -