घरमुंबईट्रेन पकडताना महिलेचा मृत्यू

ट्रेन पकडताना महिलेचा मृत्यू

Subscribe

विरार-चर्चेगट लोकल पकडताना एका महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बोरीवली स्थानकात घडली आहे. या अपघातात लोकलखाली जाऊन महिलेचा मृत्यू झाला आहे.

विरारहून सुटलेली चर्चेगट लोकल पकडताना एका ४० वर्षीय महिलेचा हात सुटून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बोरीवली स्थानकावर घडली आहे. विरार चर्चेगट लोकल बोरिवली स्थानकात आल्यानंतर ही महिला गाडी पकडण्यासाठी धावली. महिलेने गाडी पकडली मात्र या हात सुटून त्या लोकलखाली गेल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. मृत झालेल्या महिलेचे नाव अद्याप समजले नसून मृतदेह श्वविच्छेदनाकरता शताब्दी रुग्णालयात नेण्यात आला आहे.

नेमके काय घडले?

सलग चार दिवस पाऊस पडत असल्याने विरार चर्चेगेटची वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र आता ही वाहतूक पूर्वपदावर आली आहे. आज सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास विरारहून सुटलेली चर्चगेट लोकल पकडण्याच्या नादात सदर महिलेचा गाडीखाली येऊन त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -