घरमुंबईशेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून सरकार धर्माच्या नावावर पर्यटनाला; अयोध्या दौऱ्यावर संजय राऊतांची टीका

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून सरकार धर्माच्या नावावर पर्यटनाला; अयोध्या दौऱ्यावर संजय राऊतांची टीका

Subscribe

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) सध्या अयोध्या दौऱ्यावर (Ayodhya Tours) असून त्यांच्या अयोध्या दौऱ्यावर ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी टीका केली आहे. महाराष्ट्रामध्ये गेल्या ७२ तासांपासून अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतकऱ्यांचे प्रचंढ नुकसान झाले आहे. पण सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून धर्माच्या नावावर पर्यटनाला गेले असल्याची टीका संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे.

संजय राऊत म्हणाले की, मिंधे सरकार भारतीय जनता पक्षाबरोबर अयोध्येला गेले यात आनंद आहे. पण संपूर्ण सरकार अयोध्येमध्ये आहे आणि महाराष्ट्रामध्ये गेल्या ७२ तासांपासून अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतकऱ्यांचे प्रचंढ नुकसान झाले आहे. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र सर्वत्र शेतकऱ्यांचा हाहाकार उडालेला आहे. नुकसान भरपाईसंदर्भात सरकारने अधिवेशन काळामध्ये काही घोषणा केल्या होत्या. अधिवेशन संपताच आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊ आणि नुकसान भरपाई संदर्भात काही भूमिका घेऊ, असे सांगितले होते. पण शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून हे सरकार धर्माच्या नावावर पर्याटनाला गेले आहेत. यांना प्रभू श्रीरामाचा यांना आशीर्वाद अजिबात मिळणार नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

- Advertisement -

ते म्हणाले की, अयोध्येमधील साधुसंतांनी मिंधे सरकारला पाठिंबा दिला आहे, पण कालपर्यंत या साधुसंताांचा आशीर्वाद उद्धव ठाकरेंना आणि बाळासाहेबांना होता. उद्या आम्ही पुन्हा मुख्यमंत्री होऊ तेव्हा त्यांचा आशीर्वाद आम्हाला असेल. महाराष्ट्राचे प्रश्न वाऱ्यावर सोडून मिंधे सरकार अयोध्येला गेले आहेत. प्रभू श्रीराम यांना सुबुद्धी देवो आणि या महाराष्ट्राला पुन्हा चांगले दिवस येवो एवढीच मी अपेक्षा करतो, असे संजय राऊत म्हणाले.

त्यांनी सांगितले की, अयोध्या हे आता पर्यटन धार्मिक तीर्थस्थळ आहे. लोक जात-येत असतात. आम्हीसुद्धा गेलो आहोत, जात असतो आणि आम्हीच यांना अयोध्येला जाण्याचा रस्ता दाखवला आहे. आम्हीच यांना प्रभू श्रीरामच महत्त्व समजवून सांगितले आहे. सत्ता आहे तोपर्यंत त्यांना जयजयकार आणि टाळ कुटेपणा त्याठिकाणी करूदे. आम्ही जेव्हा जाऊ तेव्हा अयोध्येची जनतासुद्धा आमच्या पाठीशी कशी उभे आहे हे सर्वांना दिसेल. पण अयोध्या ही जागा राजकारण करण्याची नाही अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे मनापासून गेलात तर मनापासून मनोभावे पुजा करा, असे संजय राऊत म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -