घरमुंबईनायर रुग्णालयात आपात्कालीन परिस्थितीचे धडे

नायर रुग्णालयात आपात्कालीन परिस्थितीचे धडे

Subscribe

नायर रुग्णालयात पहिल्यांदाच आपात्कालीन परिस्थितीचे धडे देण्यात येत आहेत. विशेष म्हणजे गेल्या ३ दिवसांपासून हे प्रशिक्षण रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्स, स्टाफ आणि चतुर्थ श्रेणी कर्मचार्यांना दिलं जात आहे.

एखाद्या आपात्कालीन परिस्थितीत रुग्णालय प्रशासनातील कर्मचाऱ्यांपासून डॉक्टरांपर्यंत सर्वांचीच धावपळ होते. त्यामुळे अशी परिस्थिती कशा पद्धतीने हाताळायची? कशा पद्धतीने काम करावं? रुग्णांना उपचारांसह कसं हाताळावं? यासाठी पालिकेच्या नायर रुग्णालयात पहिल्यांदाच आपात्कालीन परिस्थितीचे धडे देण्यात येत आहेत. विशेष म्हणजे गेल्या ३ दिवसांपासून हे प्रशिक्षण रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्स, स्टाफ आणि चतुर्थ श्रेणी कर्मचार्यांना दिलं जात आहे. एनडीआरएफ आणि पालिकेच्या आपात्कालीन विभागाद्वारे रुग्णालयातील स्टाफला प्रशिक्षण दिलं जात आहे.

आतापर्यंत १९० जणांना प्रशिक्षण

आग, इमारत कोसळणे, पूर, बॉम्बस्फोट यांसारख्या आपत्कालीन परिस्थितीत काय करावं? यासाठी प्रशिक्षण देण्याचा निर्णय मुंबई पालिका प्रशासनाने घेतला आहे. आतापर्यंत रुग्णालयातील १९० जणांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. शिवाय, नायर रुग्णालयापासून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. आपात्कालीन परिस्थितीत उपलब्ध साधनांचा प्रभावी वापर कसा करावा ? प्रथमोपचार, काय करावे आणि काय करू नये ? या बाबींची प्रात्यक्षिकांसह माहिती दिली जाते आहे.

आपात्कालीन परिस्थिती म्हणजे काय ? रुग्णालयाच्या आत आणि रुग्णालयाच्या बाहेर कशापद्धतीने परिस्थिती हाताळावी? रुग्णांना कशापद्धतीने हाताळायचं? हे पहिल्या व्यक्तीपासून ते अगदी शेवटच्या व्यक्तीपर्यंत सर्वांनाच याचं प्रशिक्षण दिलं गेलं. कारण, ग्राऊंड लेवलच्या व्यक्तीला सर्वात जास्त प्रशिक्षणाची गरज असते.त्यामुळे जो व्यक्ती घटनास्थळी असतो, त्याला परिस्थिती हाताळण्याचं प्रशिक्षण आणि ज्ञान असलं पाहिजे. परदेशातील प्रत्येक व्यक्ती ही ट्रेंड असते. आपल्या इथे एखादी घटना घडली की आधी फोटो काढला जातो. पण, असं न करता अॅक्टिव्हली सपोर्ट केला पाहिजे.
– डॉ. रमेश भारमल, नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता
- Advertisement -

आपल्या इथे एखाद्या घटनेला हाताळण्यासाठी मुंबईकर पटकन प्रतिसाद देतो. पण, तात्काळ मदत करण्याच्या नादात ती मदत योग्य पद्धतीने होते आहे का ? याचं ज्ञान त्यांना नसतं. त्यामुळे या दोन्ही प्रतिसादाचं महत्त्व मोठं असल्याचं आपत्कालीन व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देणा-या चमूतील महापालिका कर्मचारी राजेंद्र रामचंद्र लोखंडे यांनी सांगितलं.

एखाद्या आपात्कालीन परिस्थिती आपत्कालीन विभाग कार्य करण्याआधी लोकांनी काय करावं यासाठी आम्ही सर्वांना प्रशिक्षण देतो. जेणेकरून एखादी आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास गोल्डन अवर्समध्ये हे लोक काम करतील आणि स्वत:चा तसेच इतरांचाही बचाव करतील.
– आशिष कुमार, नडीआरएफचे असिस्टंट कमांडट
Bhagyshree Bhuwadhttps://www.mymahanagar.com/author/bhagu/
भटकंती करायला खूप आवडतं. कोषात बसून राहणं अजिबात आवडत नाही. वडापाव प्रचंड आवडतो. जेवण तयार करण्याची आवड आहे. भरतनाट्यम शिकतेय. जीवनावर मनापासून प्रेम करते. नकार हा शब्द माझ्या शब्दकोशात नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -