घरमुंबईबोगस वैद्यकीय रिपोर्ट तयार करून एलआयसीची फसवणूक

बोगस वैद्यकीय रिपोर्ट तयार करून एलआयसीची फसवणूक

Subscribe

बोगस वैद्यकीय चाचणी रिपोर्ट तयार करून भविष्य निर्वाह निधीची (एलआयसी) फसवणूक करणार्‍या दोघांना सोमवारी गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. त्यात डॉ. राकेश रामप्रकाश दुग्गल आणि टेक्निशियन किशोर पांडुरंग सकपाळ यांचा समावेश आहे. या दोघांकडून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बोगस दस्तऐवज हस्तगत केला आहे. अटकेनंतर या दोघांनाही मंगळवारी दुपारी येथील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते, यावेळी त्यांना न्यायालयाने गुरुवार 17 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अशाप्रकारे पर्दाफाश झालेली ही पहिलीच टोळी असल्याचे बोलले जाते.

सांताक्रूझ येथील वाकोला, दत्त मंदिर रोडवरील दत्तात्रय नर्सिंग होममध्ये एलआयसीसाठी आवश्यक असलेले बोगस वैद्यकीय चाचणी रिपोर्ट तयार करून ते रिपोर्ट काही ग्राहकांना दिले जात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी सोमवारी सायंकाळी संबंधित दत्तात्रय नर्सिंग होममध्ये पोलिसांनी अचानक छापा टाकला होता. या कारवाईत पोलिसांनी विविध पेशंटचे दिनांकवार नोंद लिहिलेले मेडिकल सेंटर रजिस्टर, पेशंट नोटवही, चौदा वेगवेगळे स्टॅम्प, विविध डॉक्टरांच्या नावाची कागदपत्रे, त्यांच्या नावाने असलेले स्टॅम्प, कुर्ला मेडिकल सेंटरची काही आक्षेपार्ह कागदपत्रे, संगणक, हार्डडिस्क आदी मुद्देमाल जप्त केला आहे.

- Advertisement -

पोलीस तपासात या नर्सिंग होममध्ये एलआयसीसाठी आवश्यक असलेले बोगस वैद्यकीय रिपोर्ट तयार केले जात होते. ते रिपोर्ट डॉ. राकेश दुग्गल, टेक्निशियन किशोर सकपाळ हे इतरांच्या मदतीने बनवित होते. त्यासाठी संबंधित पेशंट असलेल्या ग्राहकांकडून कमिशन म्हणून ठरावीक रक्कम घेतली जात होती. संबंधित रिपोर्ट नंतर एलआयसीसोबत जोडले जात होते. अशाप्रकारे संबंधित लोकांनी बोगस वैद्यकीय चाचणी रिपोर्ट सादर करून एलआयसीची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -