घरमुंबई`स्वातंत्र्यवीर' लाईट अँड साऊंड शो पुन्हा सुरु

`स्वातंत्र्यवीर’ लाईट अँड साऊंड शो पुन्हा सुरु

Subscribe

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचा थ्री डी वॉल मॅपिंग तंत्रावर आधारित `स्वातंत्र्यवीर' हा लाईट अँड साऊंड शो पावसाळ्यानंतर पुन्हा सुरु होणार

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचा थ्री डी वॉल मॅपिंग तंत्रावर आधारित `स्वातंत्र्यवीर’ हा लाईट अँड साऊंड शो पावसाळ्यानंतर पुन्हा सुरु होत असून त्याचा शुभारंभ स्मारकात वाणीसंस्कार गुरु आणि ज्येष्ठ रंगकर्मी मनोहर श्यामराव जोशी यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या कार्यक्रमाचा आनंद आता दर शनिवार आणि रविवार नागरिकांना सायंकाळी घेता येईल.

राष्ट्रभक्तीचे विचार बिंबविण्याचा प्रयत्न – रणजित सावरकर

`स्वातंत्र्यवीर’ हा लाईट अँड साऊंड शो हा नव्या स्वरुपात असून त्यात स्वातंत्र्यवीरांच्या जीवनावर आधारित तसेच वैचारिक माहिती मिळत आहे. तांत्रिकदृष्ट्या सर्व पातळ्यांवर तो अव्वल ठरला असून मुंबईकरांसाठी तसेच मुंबई भेटीवर येणाऱ्या पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहे. नव्या पिढीमध्ये आधुनिक तंत्रांच्या मदतीने राष्ट्रभक्तीचे विचार बिंबविण्याचा हा एक प्रयत्न असल्याचे स्मारकारचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी याबाबत सांगितले.

- Advertisement -

दुर्गाष्टमीनिमित्ताने स्मारकात शस्त्रपूजनाचे आयोजन

दरम्यान, विजयादशमीच्या पूर्वसंध्येवर दुर्गाष्टमीनिमित्ताने स्मारकात शस्त्रपूजनाचे आयोजन करण्यात आले. वाणीसंस्कार गुरु आणि ज्येष्ठ रंगकर्मी मनोहर श्यामराव जोशी, `हे मृत्युंजय’ नाटकाचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर, स्मारकारचे कार्यवाह राजेंद्र वराडकर, कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, व्यवस्थापक संजय चेंदवणकर, स्मारकाचे उपक्रमप्रमुख, सावरकरभक्त व देशप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हिंदू संस्कृती परंपरेनुसार हा कार्यक्रम दरवर्षी नित्यपणे स्मारकात साजरा होतो. शौर्य, पराक्रम आणि विजयाचे प्रतिक म्हणून त्याचे आयोजन केले जाते. जोशी यांनी याप्रसंगी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी विचार व्यक्त केले. तसेच त्यांच्या कार्याची महती सांगितली. दिग्पाल लांजेकर यांनी `हे मृत्युंजय’ या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने निर्मिती करण्यात येत असलेल्या नाटकाविषयीची माहिती दिली. अंदमानातील स्वातंत्र्यवीरांच्या कार्याला व्यक्त करणारे हे नाटक आहे.

हेही वाचा – प्रियंका गांधी इमोशनल ब्लॅकमेलर; काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात पोस्टरबाजी
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -