घरCORONA UPDATEठाण्यात लॉकडाऊनची नियमावली जाहीर; वाचा नियम!

ठाण्यात लॉकडाऊनची नियमावली जाहीर; वाचा नियम!

Subscribe

ठाण्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या मोठ्या संख्येने वाढत असल्यामुळे आता नवी मुंबईप्रमाणेच ठाण्यात देखील लॉकडाऊनची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार २ जुलै रोजी सकाळी ७ वाजेपासून १२ जुलै रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत हा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या लॉकडाऊन कालावधीसाठी हे नियम लागू असतील. ठाण्याचे नवनियुक्त पालिका आयुक्त विपिन शर्मा यांच्या आदेशाने हे नियम लागू करण्यात आले आहेत.

काय आहेत नियम?

१. अत्यावश्यक सेवा आणि नाशिवंत वस्तूंची ने-आण करण्याशिवाय इतर सर्व कारणांवर निर्बंध
२. टॅक्सी, ऑटोरिक्षा, इंटरसिटी, एमएसआरटीसी बस, मेट्रोसह सर्व सार्वजनिक परिवहन सेवांना परवानगी नसेल. आपातकालीन वैद्यकीय सेवांसाठी प्रवाशांना परवानगी असेल.
३. खासगी वाहनांना ड्रायव्हरशिवाय फक्त एका प्रवाशाला परवानगी असेल.
४. सर्व आंतरराज्यीय बस, प्रवासी वाहतूक बंद असेल. पण बाहेरून येणाऱ्या आणि पुढे बाहेर जाणाऱ्या टुरिस्ट वाहनांना परवानगी असेल.
५. क्वारंटाईन करणं आवश्यक असलेले नागरिक बाहेर फिरल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
६. सार्वजनिक ठिकाणी अत्यावश्यक बाबींच्या खरेदीसाठी ५ पेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र यायला बंदी असेल.
७. सर्व खासगी कार्यालये, कारखाने, वर्कशॉप्स, गोडाऊन, दुकानं बंद राहतील. प्रक्रिया, फार्मास्युटिकल्स उत्पादक युनिट्सला परवानगी असेल.
८. कमीत कमी कर्मचाऱ्यांसह सरकारी कार्यालये कामकाज करतील.
९. या गोष्टींना परवानगी बँका, एटीएम, विमा, प्रसार माध्यमे, आयटी, आयटीएस, टेलिकॉम, टपाल, इंटरनेट सेवा, पुरवठा साखळी, जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक, कृषी वस्तू-उत्पादने, अन्न, फार्मास्युटिकल्स, वैद्यकीय उपकरणे, पाळीव प्राण्यांसाठी बेकरी, रुग्णालये, फार्मसी, ऑप्टिकल स्टोअर्स, पेट्रोल पंप, एलपीजी, गॅस, तेल एजन्सी, सुरक्षा, सुविधा व्यवस्थापन, कोविड नियंत्रणासाठी पुरवठा करणाऱ्या संस्था.
१०. मद्यविक्री फक्त होम डिलिव्हरीची परवानगी असेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -