घरमुंबईLok Sabha : सुळसुळीत वचननामा आणि बुळबुळीत वचने; ठाकरेंच्या जाहीरनाम्यावर भाजपाची सडकून...

Lok Sabha : सुळसुळीत वचननामा आणि बुळबुळीत वचने; ठाकरेंच्या जाहीरनाम्यावर भाजपाची सडकून टीका

Subscribe

सुळसुळीत वचननामा आणि बुळबुळीत वचने, असा टीका आशिष शेलार यांनी ठाकरे गटाच्या जाहीरनाम्यावर केली आहे.

मुंबई : लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून आपला जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येत आहे. याचपार्श्वभूमीवर आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. त्यांनी आपल्या जाहीरनाम्याला वचननामा असे नाव दिले आहे. सत्तेत आल्यानंतर महाराष्ट्रात विकास करू, याशिवाय शेतकरी वर्ग, महिला आणि बेरोजगारांसाठीही ठाकरे गटाने अनेक घोषणा केल्या आहेत. मात्र आता ठाकरे गटाच्या वचननाम्यावर भाजपाकडून टीका होताना दिसत आहे. (Lok Sabha Election 2024 BJP strongly criticizes Thackeray’s manifesto)

भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी ट्वीट करताना म्हटले की, महाराष्ट्रात प्रकल्पांना वसूलीसाठी विरोध करून ज्यांनी पळवून लावले, ते आज सांगत आहेत की, वित्तीय केंद्र नव्याने उभे करणार, जिल्ह्यात रोजगार देणार. कोरोनामध्ये ज्यांनी खिचडी, बॉडी बॅगमध्ये भ्रष्टाचार केला ते आज सांगत आहेत, जिल्हा रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्र अद्ययावत करणार आहे. शेतकऱ्यांना बांधावर जाऊन मदत करू म्हणाले आणि सत्ता आल्यावर विसले, ते आज आता सांगत आहेत की, पीक विम्याचे निकष बदलणार, शेतकऱ्यांना लागणारे खते, बियाणे जीएसटी मुक्त करणार आहे, अशी टीका आशिष शेलार यांनी केली.

- Advertisement -

भारतच्या एकात्मतेला छेद देण्यासाठी काँग्रेसने जो तुकडे तुकडे गँगचा जाहीरनामा मांडला त्यालाच पुढे नेण्यासाठी उबाठा सांगत आहे, सत्तेचे विकेंद्रीकरण करू, कर दहशतवाद थांबवू थोडक्यात काय तर, भूमिकांमध्ये युटर्न फेम असलेले आणि दिलेला शब्द न पाळणाऱ्या उध्दव ठाकरे यांच्या हातून “वचननामा” प्रकाशनाप्रसंगी निसटला. खरं तर सुळसुळीत वचननामा आणि बुळबुळीत वचने, असा टोला आशिष शेलार यांनी लगावला आहे. 

- Advertisement -

हेही वाचा – MNS : शालिनी ठाकरेंच्या भूमिकेपासून मनसे चार हात दूर, म्हणाले…

ठाकरे गटाच्या वचननाम्यात काय? 

  • राज्यात चाललेली लूट थांबवू, महाराष्ट्राचं वैभव वाढवू.
  • वित्तीय केंद्र नव्याने उभारू, युवकांना नोकरीच्या संधी देऊ.
  • जिल्हा रुग्णालये अद्यायावत करू.
  • ग्रामीण भागात, प्राथमिक उपचार केंद्र आधुनिक करणार.
  • शेतकऱ्यांना कर्जमुक्त करु, पीकविमाचे निकष बदलू.
  • बी बीयाणे, खतं यांच्यावरील जीएसटी मुक्त करु.
  • तसंच, शेतकऱ्यांना गोदामं, शितगृह देऊ.
  • कृषीखात्यात सर्व्हे करणारं विभाग स्थापन करून, ज्या पिकाला मागणी आहे, तेच पीक घ्यायला सांगणार त्याला
  • हमीभाव शेतकऱ्यांना देणारच
  • उद्योग स्नेही वातावरण राज्यात निर्माण करू, पर्यावरण स्नेही उद्योग आणू
  • सत्तेचं विकेंद्रीकरण करु
  • कर दहशतवाद थांबवू
  • जीएसटीमधील त्रासदायक अटीशर्थी आर्थिक सल्लागारांशी बोलून थांबवू
  • सरकारी नोकऱ्यांमध्ये  महिलासांठी 50 टक्के जागा देणार, सुरक्षा देणार.
  • मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देऊ.
  • जीवनावश्यक वस्तूंचे भाव पाच वर्षे स्थीर ठेवण्याचा प्रयत्न करू.

Edited By – Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -