घरमुंबईPrakash Ambedkar : भाजपाकडून मुस्लिमांना वंचित ठेवण्याचा प्रयत्न! प्रकाश आंबेडकरांचा आरोप

Prakash Ambedkar : भाजपाकडून मुस्लिमांना वंचित ठेवण्याचा प्रयत्न! प्रकाश आंबेडकरांचा आरोप

Subscribe

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपा भारतातील मुस्लिमांच्या विरोधात भेदभाव करत त्यांच्याविरोधात धोरणे राबवून त्यांना वंचित ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपा भारतातील मुस्लिमांच्या विरोधात भेदभाव करत त्यांच्याविरोधात धोरणे राबवून त्यांना वंचित ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज केला. तसेच काँग्रेसने याबाबत मौन बाळगले असून सीएए आणि एनआरसी हे त्यांचे उदाहरण असल्याचे सांगत आंबेडकर यांनी काँग्रेसवरही निशाणा साधला आहे. (Lok Sabha Election 2024 BJPs attempt to deprive Muslims Prakash Ambedkar Allegation)

प्रकाश आंबेडकर यांनी आज ’एक्स’ या समाजमाध्यमावर ट्वीट करत संघ-भाजपा आणि काँग्रेसवर हल्ला चढवला आहे. भारतातील मुस्लिम हे घुसखोर नाहीत. ते आपल्या विविधतेने नटलेल्या, बहुविध आणि धर्मनिरपेक्ष देशाचे समान नागरिक आहेत. मात्र, आरएसएस-भाजपा सातत्याने भेदभावपूर्ण धोरणे राबवून भारतातील मुस्लिमांना वंचित ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे, अशी टीका आंबेडकर यांनी केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha 2024: सोलापूरमधून वंचित बहुजन आघाडीचे राहुल गायकवाड यांची उमेदवारी मागे; फायदा कोणाला? 

- Advertisement -

काँग्रेसने अकोल्यातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य इस्लामोफोबिक उमेदवार यांना उमेदवारी दिली आहे. उमेदवाराच्या वडिलांनी बाबरी मशीद पाडण्यासाठी कारसेवक पाठवले होते. तसेच, उमेदवाराने स्वत: अनेक मुस्लिमविरोधी, आरएसएस समर्थक पोस्ट टाकल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत मुस्लिम उमेदवार देण्यात काँग्रेस अपयशी ठरली आहे. काँग्रेसचे मौन आरएसएस-भाजपाच्या भीतीच्या राजकारणाला प्रोत्साहन देत असून, त्यांच्या मौनामुळे मुस्लिमांचा विश्वासघात झाल्याचे आंबेडकर यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – NCP Manifesto : शरद पवारांच्या गुरूबाबत अजितदादांकडून जाहीरनाम्यात मोठं आश्वासन

मोदी मौत का सौदागर!

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुस्लिमांंविषयी केलेले द्वेषपूर्ण भाषण आणि जातीय आधारावर मतदान करण्याचे आवाहन त्यांच्या जिंकण्याच्या उदासीनतेबद्दल बरेच काही सांगून जाते. यामुळेच वंचित बहुजन आघाडीने त्यांना द्वेषपूर्ण, जातीयवादी आणि मौत का सौदागर असे नाव का दिले आहे, हे सिद्ध होत असल्याचे ट्विट वंचितने केले आहे.

Edited By – Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -