घरमुंबईघराणेशाही संपुष्टात यावी

घराणेशाही संपुष्टात यावी

Subscribe

अभिनेता-मिलींद गवळी…

डॉक्टरांचा मुलगा डॉक्टर, वकिलांचा मुलगा वकील होतो, त्यासाठी त्याला अभ्यास करावा लागतो. राजकारणाच मात्र वेगळे आहे. वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकून यायचे म्हणजे त्याला फारशा शिक्षणाची आवश्यकता लागत नाही. वडिलांचे राजकारण पुरेसे असते. त्यामुळेच घराणेशाही संपुष्टात यावी असे मला प्रामाणिकपणे वाटते. आता आचारसंहितेमुळे एक चांगली गोष्ट घडते आहे. उमेदवाराचा तपशील जाहीर केला जात आहे.

- Advertisement -

भारतात जेवढे उमेदवार उभे आहेत, त्यांची माहिती आता मिळणे शक्य झालेले आहे. सुजाण मतदारांनी या माहितीच्या आधारावर उमेदवाराची वृत्ती, त्याचे शिक्षण, संपत्ती, त्याने केलेले गुन्हे, समाजातील त्याचे स्थान समजून घेऊन ज्याचा तपशील घातक त्याला मतदान न करणे हे मतदाराने आपले कर्तव्य मानले पाहिजे. आपण इन्कम टॅक्स भरतो, त्यातून गावाचा, शहराचा विकास व्हावा अशी अपेक्षा असते.

सामान्य माणसाच्या खिशातून गेलेला हा पैसा सामाजिक जाणीव नसलेल्या, स्वत:ला नेता म्हणवणार्‍याच्या घशात जात असतो. दुसरे म्हणजे भारतीय कायद्यामध्ये बदल व्हायला हवा. ब्रिटीशांच्या काळापासून चालत आलेले कायदे प्रथम बंद करायला हवेत. अरबी देशात जसा गुन्हा तसे शासन असल्यामुळे तिथे गुन्हेगारीला जास्त प्राधान्य नाही तशी काहीशी कडक कारवाई भारतात व्हायला हवी. मतदारांनी नोटाचा वापर करू नये.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -