घरमुंबईनिवडणुकीच्या तोंडावर संघटित गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणार

निवडणुकीच्या तोंडावर संघटित गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणार

Subscribe

सराईत गुन्हेगारांची यादी करणार, सोशल मीडियावरील समाजकंटकावर लक्ष केंद्रित करणार

देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून येत्या निवडणुकीच्या काळात महाराष्ट्रात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून विशेष दक्षता घेण्यात येत आहे. मुंबई पोलिसांसह राज्यातील इतर पोलीस विभागांकडून सराईत गुन्हेगार तसेच संघटित गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी या गुन्हेगारीची यादी तयार करण्यास सुरुवात केली आह.

राज्यात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरुवात झाली असून येत्या लोकसभा निवडणुकीत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये तसेच राज्यात कायदा व सुव्यस्था कायम राहावी यासाठी राज्य पोलीस दलासह मुंबई पोलिसांनी कंबर कसली आहे. या निवडणुकीत मुंबई पोलिसांसह राज्यातील इतर पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. या वेळी पोलिसांना संघटित गुन्हेगार, सराईत गुंड तसेच सोशल मीडियावरील समाजकंटक याच्यावर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर आदी महत्वाच्या शहरांवर पोलिसांचे बारीक लक्ष असणार असून यासाठी पोलिसांनी आतापासूनच तयारी सुरु केली आहे. मुंबई तसेच राज्यातील महत्वाच्या शहरांतील पोलीस आणि गुन्हे शाखेने सराईत गुंड, संघटित गुन्हेगार , तसेच सोशल मीडियावरील समाजकंटकाची यादी बनवण्यास सुरुवात केली आहे. या गुन्हेगारीपेक्षा आता पोलिसांचे सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर लिहून पाठवणार्‍या समाजकंटकांवर विशेष लक्ष असणार असून सायबर सेल अशा समाजकंटकाची यादी तयार करीत असल्याचेही अधिकार्‍याने सांगितले.

- Advertisement -

असा असणार एक्शन                                                                                                            एकट्या मुंबईतून पोलिसांनी हजारो जणांची यादी तयार केली असून या यादीमध्ये विविध गुन्हेगार टोळ्यांचे  गुंड, सराईत गुन्हेगार तसेच अभिलेखावरील गुन्हेगारांची नावे असून या गुन्हेगारांचा ठावठिकाण शोधून त्यांना पोलिसांकडून नोटीस पाठवण्यात येत आहे. या नोटीसीनंतर त्यांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांना समज देऊन त्यांच्याकडून हमीपत्र लिहून घेण्यात येणार आहे. तसेच ज्या व्यक्तीवर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे, त्यांच्यावर मुंबई पोलीस कायदा अंतर्गत गुन्हे दाखल करून त्यांना कोर्टापुढे हजर करण्यात येणार आहे. तसेच संघटित गुन्हेगारीवर प्रतिबंधात्मक कारवाई करून कोर्टाच्या आदेशावरून त्यांना हद्दपारीची नोटीस बजावण्यता येईल, असे एका पोलीस अधिकार्‍याने सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -