घरमुंबईगिरणी कामगारांसाठी ४ हजार घरांची लॉटरी

गिरणी कामगारांसाठी ४ हजार घरांची लॉटरी

Subscribe

- डिसेंबर महिन्यात लॉटरी होणार

बहुप्रतिक्षित अशी म्हाडातील गिरणी कामगारांसाठी जवळपास ४ हजार घरांची लॉटरी डिसेंबर महिन्यात काढण्यात येणार आहे. लॉटरीसाठीची काही औपचारिकता पूर्ण झाल्यावर लॉटरी काढण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. हायकोर्टाने नेमलेल्या उच्चाधिकार समितीच्या सूचनांची पुर्तता करण्यासाठी सध्या म्हाडा प्राधिकरणाकडून कार्यवाही करण्यात येत आहे. त्यानंतरच डिसेंबर महिन्यात लॉटरी काढण्यात येईल, असे म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी राधाकृष्णन यांनी सांगितले.

म्हाडाच्या गिरणी कामगारांच्या लॉटरीसाठी उच्चाधिकारी समितीसमोर म्हाडा प्रशासनाकडून काही अटींमध्ये बदल करण्याची विनंती करण्यात आली होती. पण या बदलांसाठी म्हाडाच्या उपाध्यक्षांच्या विशेष समितीकडून मान्यता घेण्याचे उच्च समितीने स्पष्ट केले होते. म्हाडाच्या गिरणी कामगारांच्या अर्जदारांचे लॉटरीनंतर स्क्रिनिंग (पडताळणी) करावे ही मागणी म्हाडा प्रशासनाकडून करण्यात आली होती. मोठ्या प्रमाणात अर्जदारांची संख्या पाहता ही विनंती प्रशासनाकडून करण्यात आली होती. आता उच्च समितीकडे ही मागणी मंजुर झाल्यानंतर लॉटरी काढण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

- Advertisement -

गिरणी कामगारांचे वारसदार तसेच लाभार्थी यांच्याकडे लॉटरीसाठी पोहचण्यासाठी म्हाडाकडून विविध माध्यमांद्वारे संपर्क झाला आहे. त्यामुळे या लॉटरी प्रक्रियेत अधिकाधिक लोकांनी सहभागी व्हावे हा मानस म्हाडा प्रशासनाचा आहे. पण काही गिरणी कामगार संघटनांनी गिरणी कामगारांच्या लॉटरीसाठी पडताळणी प्रक्रिया आधीच करावी, अशी मागणी केली होती. बोगस लाभार्थीही यामध्ये सहभागी होतील अशी गिरणी कामगार संघटनांचे म्हणणे आहे. पण म्हाडा प्रशासनाने आता पडताळणी प्रक्रिया लॉटरीनंतरच करण्याचे निश्चित केले आहे.

आयटीकडून सॉफ्टव्हेअर अपेक्षित
म्हाडाच्या गिरणी कामगारांच्या लॉटरीसाठी सध्या म्हाडाच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाकडून आता सॉफ्टव्हेअऱमध्ये बदल करण्यात येत आहेत. गिरणी कामगारांच्या लॉटरीसाठी सॉफ्टव्हेअऱचे कोडिंगचे काम सध्या आयटी विभागाकडून सुरू आहे. त्यामुळे या कामासाठी आणखी काही दिवस लागणार आहेत. त्यासाठी साधारणपणे १५ दिवसांचा कालावधी अपेक्षित आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -