घरमुंबईरेल्वे कंत्राटदाराच्या कामाची पोलखोल; कामासाठी आणलेल्या ट्रकचे चाक फसले!

रेल्वे कंत्राटदाराच्या कामाची पोलखोल; कामासाठी आणलेल्या ट्रकचे चाक फसले!

Subscribe

या घटनेमुळे रेल्वे कंत्राटदाराच्या निकृष्ट दर्जाच्या कामाची पोलखोल झाली आहे.

रेल्वेच्या कंत्राटदाराच्या निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे ट्रक फसल्याची घटना डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात घडली आहे. फलाटाच्या कामासाठी मागविण्यात आलेला खडीचा ट्रक येथील गटारावरील स्लॅबचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याने या ट्रकचे चाक फसले. या घटनेमुळे रेल्वे कंत्राटदाराच्या निकृष्ट दर्जाच्या कामाची पोलखोल झाली आहे.

Low quality work of railway contractor, truck wheels broken

- Advertisement -

कंत्राटदाराच्या कामाची पोलखोल

डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक १च्या कामासाठी खडीचा ट्रक मागविण्यात आला होता. ट्रकमधील खडी पूर्णपणे खाली केल्यानंतर अचानक ट्रकचे एक चाक फसले गेले. गटारावरील स्लॅब खचल्याने ट्रकचे चाक फसल्याची माहिती ट्रक चालकाने दिली. या प्रकारामुळे रेल्वेच्या कंत्राटदाराकडून निकृष्ट दर्जाचे काम केले जात असल्याची पोलखोल झाली. ट्रक बाहेर काढण्यासाठी क्रेन मागविण्यात आल्याचे ट्रक चालकाकडून सांगण्यात आलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -