घरमुंबईमुंबईतील लक्झरी घरांच्या किमतीत झाली वाढ

मुंबईतील लक्झरी घरांच्या किमतीत झाली वाढ

Subscribe

जगात मुंबई ही लक्झरी घरांच्या किमतीत २८व्या क्रमांकावर आहे. तर पहिल्या क्रमांकावर रशियातील मॉस्को आहे.

आंतरराष्ट्रीय मालमत्ता सल्लागार नाइट फ्रँकच्या ‘प्राइम ग्लोबल सिटीज इंडेक्स’ अहवाल नुकताच सादर केला आहे. या अहवालात जगभरातील लक्झरी घरांच्या किमतीचा अभ्यास करण्यात आला असून मुंबई हे शहर २८ व्या क्रमांकावर आहे. अहवालानुसार गेल्या वर्षभरात रशियामधील मॉस्को शहरात लक्झरी घरांच्या किमतीत ११ टक्के वाढ झाली आहे. तर भारतातील नवी दिल्लीमध्ये ४.४ टक्यांनी वाढ झाली असून नवी दिल्ली नवव्या क्रमांकावर आहे. नवी दिल्लीच्या नंतर बंगळूरू शहरात २.१ टक्के वाढ होऊन ते २० क्रमांकावर आहे. वर्षभरात मुंबईतील लक्झरी घरांच्या किमतीत ०.८ टक्के वाढ झाली आहे.

२०१९ च्या दुसऱ्या तिमाहीमध्ये नवी दिल्ली दहाव्या स्थानांवरून एक स्थानांनी वर सरकले. तर मुंबई २३० व्या स्थानांवरून दोन स्थानांनी वर सरकले. तसंच बंगळुरू पाच स्थान खाली सरकले आहे. नवी दिल्लीमध्ये २०१९च्या तिसऱ्या तिमाहीत प्राइम निवासी प्रॉपर्टीजच्या सरासरी भांडवल मूल्यांमध्ये वाढ झाली. प्रति चौरस फूट ३३ हजार ५११ रुपयांच्या नोंदणीसह वार्षिक किमतीत ४.४ टक्के वाढ झाल्याचे दिसून आले आहे. ४५ शहरांसाठी वर्षभरातील प्राइम निवासी किमतींमधील बदल २०१९च्या तिसऱ्या तिमाहीपर्यंत सरासरी १.१ टक्के होती. हेच प्रमाण २०१७ मध्ये ४.२ आणि २०१८ मध्ये ३.४ टक्क्यांच्या तुलनेत कमी आहे.

- Advertisement -

मुंबईतील ‘या’ भागांतील लक्झरी घरांच्या किमतीत वाढ

  1. कफ परेड
  2. नेपियन सी रोड
  3. कुलाबा
  4. लोअर परळ
  5. वरळी
  6. ताडदेव
  7. जुहू
  8. बीकेसी
  9. सांताक्रुझ (प)
  10. वांद्रे (प)
  11. खार (प)
  12. प्रभादेवी

हेही वाचा – ‘वन रुपी’मुळे महिलेची स्थानकावरच सुखरुप प्रसूती


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -