घरमुंबईराज्यपालांच्या अभिभाषणानंतर विशेष अधिवेशनाचं सूुप वाजलं!

राज्यपालांच्या अभिभाषणानंतर विशेष अधिवेशनाचं सूुप वाजलं!

Subscribe

आज विधानसभेच्या विशेष अधिवेशनाचा दुसरा आणि शेवटचा दिवस आहे. या विशेष अधिवेशनात सत्ताधारी पक्षाची बहुमत चाचणी झाली. त्यामध्ये सत्ताधारी महाराष्ट्र विकास आघाडीला यश आले. त्यानंतर आज विधानसभेच्या अध्यक्षपदाची आणि विरोधी पक्षनेतेपदाची निवड करण्यात आली. काँग्रेसचे नेते नाना पटोले यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी तर भाजपचे गटनेते देवेंद्र फडणवीस यांची विरोधीपक्षनेते पदी निवड झाल्याची घोषणी नवनिर्वाचीत विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली. यावेळी प्रत्येक पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी शेवटी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणानंतर विधिमंडळाच्या या दोनदिवसीय विशेष अधिवेशनाचं सूप वाजलं.

‘भुजबळ साहेब इतके घाबरू नका. हवं तर तुमच्यासकट मी पुन्हा येईन. ज्या दिवशी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी एकत्र आले, त्या दिवशी राजकारणात काहीही होऊ शकतं हे सिद्ध झालं आहे. आणि जयंत पाटील साहेब, तुमचं खरंच आहे. मी सांगितलेल्या सर्व प्रकल्पांची सुरुवात केली आहे. एकही राहिला नाही. आणि कदाचित त्यांचं उद्धाटन करायला देखील मीच जाईन. तुमच्या गाडीत जायचं की माझ्या, हे तुम्ही सांगा’, अशा शब्दात भाजपचे गटनेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहातील सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांना उत्तर दिले.

- Advertisement -

दिवसभरातील विधानभवनातल्या घडामोडी सविस्तर:

नाना पटोले यांची बिनविरोध अध्यक्षपदी निवड

बहुमत चाचणी सिद्ध करण्यासाठी शनिवार आणि रविवार हे दोन दिवस विशेष अधिवेशन भरवण्यात आले आहे. शनिवारी सत्ताधारी महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचे विधानसभेत बहुमत सिद्ध झाले. त्यानंतर रविवारी म्हणजे आज विधानसभेच्या अध्यक्षाची निवडणूक होती. भाजपकडून ज्येष्ठ नेते किसन कथोरे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपच्या नेत्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न केले. यात त्यांना यश आले आणि काँग्रेसचे नाना पटोले यांची बिनविरोध अध्यक्षपदी निवड झाली. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी यावेळी पटोले यांच्या हातात अध्यक्षपदाची सुत्रे सोपवली.

- Advertisement -

उद्धव ठाकरेंकडून नाना पटोले यांचे कौतुक

विधानसभेचे सुत्र हाती घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाना पटोले यांचे कौतुक आणि त्यांना अभिनंदन केले. ‘सभागृहात बोलताना उद्धव ठाकरे यांनी नाना पटोले यांचे कौतुक आणि अभिनंदन केले. नाना पटोले शेतकऱ्यांचे नेते आहेत. भाजपसोबत असतानाही त्यांनी त्यांचा आक्रमक बाणा कायम ठेवला. शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीत म्हणून त्यांनी थेट खासदारकीचा राजीनामा दिला आणि भाजपमधून ते बाहेर पडले. त्यांचा स्वभाव अतिशय बंडखोर आहे. कोणाचीही भीडभाड न बाळगता ते त्यांची मते व्यक्त करतात’, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे यांच्या पाठोपाठ शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील, छगन भुजबळ, अजित पवार काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात, भाजपचे गटनेते देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे, अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्यासह अनेक आमदारांनी नाना पटोले यांचे अभिनंदन केले.

यानंतर नाना पटोले यांनी आपली प्रतिक्रिा दिली. ‘मी कडक अध्यक्ष आहे असा शेरा जाऊ नये याची मी काळजी घेईन. पण तुम्हीही काळजी घ्या आणि कुणावरही कारवाई होईल, अशी वर्तवणूक करु नका’, असे नाना पटोले म्हणाले.

विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे अभिनंदन केले.

विरोधी पक्षनेतेपदाच्या घोषनेनंतर उद्धव ठाकरे काय म्हणाले?

‘अध्यक्ष महोदय आज या सदनामध्ये विरोधी पक्षनेतेपदी तुम्ही देवेंद्र फडणवीस यांची निवड केली. आपल्या निर्णयाबद्दल मी आपले आभार मानण्यासाठी आणि देवेंद्रजी यांचे अभिनंदन करण्यासाठी मी आज येथे उभा आहे. ही निवड झाल्यानंतर साहजिकच आहे,काल माझा सभागृहातला पहिला दिवस होता. मी माझ्या मंत्र्यांची सभागृहात ओळख करुन दिली. आज देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलण्यासाठी माझ्यासमोर जी त्यांची ओळख आली, ती आधीच आली पाहीजे. काल माझ्या आयुष्यातला पहिला दिवस होता आणि त्यावेळेला मी माझ्या सहाकरी मित्रांची ओळख सभागृहाला करुन दिली. देवेंद्रजी आपण गेले २५ ते ३० वर्षे एकत्र आहोत. आपला परिचय आज माझ्या हातात आला. हा आधी आला असता तर बरं झालं असतं. कारण या दिवसाची आणि या नात्याची मला अपेक्षा नव्हती. एका दृष्टीने पाहिलं तर मी आजपर्यंतचा सर्वात भाग्यवान मुख्यमंत्री आहे. कारण जे २५ ते ३० वर्ष विरोधात होते ते माझे मित्र झाले आहेत. जे मित्र होते ते विरोधात बसले आहेत. म्हणून मला प्रामाणिकपणाने असं वाटतं की, विरोधी पक्ष अस्तित्वात राहणार नाहीत. कारण विरोधी पक्षातले माझे मित्र आहेत’, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर जयंत पाटील यांनी केले फडणवीस यांचे अभिनंदन

‘माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा येईल म्हणाले होते. पण आल्यावर कुठे बसणार हे त्यांने सांगितले नव्हते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचे विरोधी पक्षनेतेपदी बसल्यानंतर आता अभिनंदन केले पाहीजे. मी असे बोलणार नाही की, आपण कायम विरोधी पक्षनेतेपदी बसणार. कारण त्याने उत्साह कमी होतो. तुम्ही पुन्हा जनतेच्या आशीर्वादाने आणि लोकशाही मार्गाने २०२४ इथे सत्ताधारी बाकावर या’, असे जयंत पाटील म्हणाले.

फडणवीसांनी खडसेंसारखं काम करावं – छगन भुजबळ

दरम्यान, यावेळी देवेंद्र फडणवीसांना एकनाथ खडसेंच नाव घेऊन भुजबळांनी डिवचल्याचं पहायला मिळालं. ‘आम्ही सभागृहात पाहिले आहे. जेव्हा एकनाथ खडसे विरोधी पक्षनेते होते, तेव्हा ते हळूच एखादा कागद फडणवीस यांना देऊन त्यांना बोलायची संधी द्यायचे. ज्याप्रमाणे खडसेंनी तुम्हाला तयार केले, त्याप्रमाणे आता फडणवीसांनी मागच्यांना तयार करावे. मागच्या बाकावर बसणाऱ्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न करावा’, असा खोचक टोला भुजबळांनी यावेळी लगावला.

यानंतर देवेंद्र फडणवीस अध्यक्षांनी बोलण्याची संधी दिली. देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सविस्तर भाषण केले. यामध्ये ते भुजबळांना पुढच्यावेळी तुमच्यासोबत पुन्हा निवडून येईल, असे फडणवीस म्हणाले. ‘ज्या दिवशी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी एकत्र आले, त्या दिवशी राजकारणात काहीही होऊ शकतं हे सिद्ध झालं आहे’, असं देखील ते यावेळी म्हणाले.

यानंतर थोड्या वेळाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे विधानभवनात आगमन झाले. त्यानंतर राज्यपालांनी विधानभवनात आपले अभिभाषण केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -