घरमुंबईअखेर माहुलवासीयांना मिळाला म्हाडाचा आधार

अखेर माहुलवासीयांना मिळाला म्हाडाचा आधार

Subscribe

संक्रमण शिबिरात ३५० घरे मिळणार

मानवतेच्या मुद्यावर माहुलवासीयांना म्हाडाने संक्रमण शिबिरातील ३५० घरे उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले असल्याची माहिती आज म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी दिली. मुंबईत गोराई, पवई आणि बोरिवली या तीन ठिकाणी संक्रमण शिबिरातील घरे यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. माहुल परिसरात आरोग्याची समस्या निर्माण झाल्याने या परिसरातील लोकांना प्राधान्याने पर्यायी जागा देण्याची गरज आहे. त्यामुळेच म्हाडा आणि मुंबई महापालिका यांच्या संयुक्त प्रयत्नाने संक्रमण शिबिरातील घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. येत्या मे महिन्यात म्हाडाकडे २ हजार संक्रमण शिबिरातील घरे उपलब्ध होणार आहेत. या घरांचा विचार हा बीडीडीवासीयांच्या पुर्नवसनासाठी करण्यात येणार आहे.

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी माहुलवासीयांच्या घराबाबतचा मुद्दा प्रामुख्याने लावून धरला. नुकतीच मुख्यमंत्री, मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेत या प्रश्नावर बैठक झाली. त्यामध्ये म्हाडाने संक्रमण शिबिरातील घरे उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारपुढे मांडला आहे. ज्या लोकांना प्रदूषणाचा सर्वाधिक त्रास झाला आहे, अशा लोकांना संक्रमण शिबिरात प्राधान्याने हलवण्यात यावे. त्यासाठीची यादीही तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मुंबई महापालिका आणि म्हाडा यांच्यामध्ये संक्रमण शिबिराबाबत करार करण्यात येईल. त्यामुळे घुसखोरीसारखे प्रकार होणार नाहीत, असे सामंत म्हणाले. म्हाडाकडे सध्या ६०० संक्रमण शिबिरातील घरे आहेत. पण त्यापैकी ३५० घरे ही मानवतेच्या मुद्यावर देण्यात येणार आहेत. माहुलच्या विषयाबाबत मेधा पाटकर यांच्याशी मी चर्चा केली आहे. माहुलवासीयांना म्हाडाच्या माध्यमातून मदतीचा हात आम्ही पुढे केला आहे. याबाबत लवकरच निर्णय होणे अपेक्षित आहे.

- Advertisement -

माहुलसाठी प्राधान्य यादी
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, स्थानिक आमदार मंगेश कुडाळकर यांच्यासोबत चर्चेनंतर मानवतेच्या दृष्टीकोनातून म्हाडाची संक्रमण शिबिरातील घरे उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. अत्यावश्यक बाब म्हणून याबाबतचा शासन निर्णय होणे अपेक्षित आहे. माहुल परिसरात आरोग्याचा विषय बिकट झाल्याने मृत्यू, स्थानिकांना आरोग्याचा होणारा त्रास पाहता यासाठी प्राधान्य यादी तयार करणे गरजेचे आहे. घर कोणत्या निकषावर द्यायचे आणि कोणाला किती प्राधान्याने द्यावे याचा निर्णय हा मुंबई महापालिका घेणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -