घरमुंबईकरदात्यांनो तुमच्यासाठी महत्त्वाचे! आयकराच्या फॉर्म 26AS मध्ये झाले 'हे' मोठे बदल

करदात्यांनो तुमच्यासाठी महत्त्वाचे! आयकराच्या फॉर्म 26AS मध्ये झाले ‘हे’ मोठे बदल

Subscribe

आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर २०२० झाली आहे.

आयकर परतावा भरणे आता पूर्वीपेक्षा अधिक सोपे होणार आहे. कारण आयकर विभागाने नुकताच फॉर्म 26AS मध्ये काही बदल (Form 26A changed of Income Tax Return) केले आहेत. त्यामुळे तुम्ही आयकर परतावा भरणार असाल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आता करदात्याला या नव्या फॉर्ममध्ये सर्वच मोठे आर्थिक व्यवहार नमूद करावे लागणार आहेत.

म्हणजेच, 26AS फॉर्ममध्ये टीडीएस कपात  (TDS) आणि उत्पन्नाच्या स्रोतावर कर गोळा (TCS) करण्याची माहिती द्यावी लागते. आता या फॉर्ममध्ये मालमत्ता आणि शेअर खरेदी-विक्रीची माहितीही द्यावी लागणार आहे. आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर २०२० झाली आहे. करदात्याला या नव्या फॉर्ममध्ये सर्वच मोठे आर्थिक व्यवहार नमूद करावे लागणार असल्याने करदात्यांना फॉर्मच्या मदतीने त्यांनी केलेले व्यवहार लक्षात राहणार आहेत.

- Advertisement -

 

- Advertisement -

आयकर विभागाने लॉकडाऊन काळात २१.२४ लाख करदात्यांना ७१ हजार २२९ कोटी रुपये परतावा दिला आहे. यामध्ये २४ हजार ६०३ कोटी रुपयांचा व्यक्तीगत करदात्यांना परतावा देण्यात आला आहे. या करदात्यांची संख्या १९.७९ लाख आहे. तर कंपनी कराअंतर्गत १.४५ लाख करदात्यांना ४६ हजार ६२६ कोटी रुपये परत करण्यात आले आहेत.

दरम्यान, केंद्र सरकारच्या सूचनेनुसार जे परताव्याचे दावे आहेत ते प्राथमिकतेने सोडविले जात असून हे दावे ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत. याचबरोबर केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने करदात्यांना विनंती केली आहे. यासाठी त्यांनी परताव्याच्या वेगवान प्रक्रियेसाठी आयकर विभागाच्या ईमेलवर लगेचच उत्तर पाठविण्यास सांगितले गेले आहे.


Fort Building Collapse – पीडित रहिवासी अजूनही पुनर्वसनाच्या प्रतिक्षेतच!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -