घरमुंबईगाडीच्या आडवे आले म्हणून घेतला जीव

गाडीच्या आडवे आले म्हणून घेतला जीव

Subscribe

मुंबई : मुंबईमध्ये वाहतुकीचे नियमे धाब्यावर बसवून कित्येकजण गाडी चालवतात. पण यामुळे अनेक भांडणेसुद्धा होतात. कुर्ला परीसरात राहणार्‍या संपत सोनावणे यांनासुद्धा अशाच प्रकारच्या एका भांडणाला सामोरे जावे लागले, मात्र त्यांना त्यांचा जीव गमवावा लागला. रस्ता ओलांडणार्‍या व्यक्तीचा दुचाकीस्वाराने केलेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना कुर्ला परीसरात घडली आहे. या प्रकरणी नेहरूनगर पोलिसांनी दुचाकीस्वार राहुल बाबारिया आणि त्याचा सोबत असलेल्या अनोज बनसोड याला ४८ तासांत अटक करुन कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

कुर्ल्याच्या ठक्कर बाप्पा कॉलनी येथे मयत संपत सोनावणे हे रस्ता पार करत होते. याच वेळी उलट्या दिशेने दुचाकी चालवत दोन्ही आरोपी आले. या वेळी मयत संपत आणि आरोपींची त्यांच्याशी शाब्दिक बाचाबाची झाली. त्याचे पर्यवसन हाणामारीत झाले. आरोपींनी संपत याला मारहाण केली असता त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना प्रथम राजवाडी रुग्णालयात उपचारास दाखल केले परंतु रुग्णालयाने देखील फक्त प्राथमिक उपचार करून त्यांना घरी सोडले. परंतु त्यांच्या डोक्याला अंतर्गत दुखापत झाल्याने त्यांना प्रचंड त्रास होऊ लागला. अखेर त्यांना सायन रुग्णालयात उपचारास हलविण्यात आले. तिथेच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात अट्टल गुन्हेगार असलेल्या राहुल बाबारिया आणि त्याचा सोबत असलेल्या अनोज बनसोडे याला बेड्या ठोकल्या आहेत.

- Advertisement -

संपत सोनावणे यांच्या डोक्याला रस्त्यावर आपटण्यात आले होते यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती या घडलेल्या प्रकारानंतर पोलिसांनी वेेगवेगळ्या ठिकाणी शोध घ्यायला सुरुवात केली.खबर्‍यांकडुन मिळालेल्या माहीतीनुसार सदर गुन्ह्यातील प्रमुख आरोपी हा न्यू पनवेल मधल्या सुकापुर या ठिकाणी असणार्‍या आशा की कीरण या नशा मुक्ती केंद्रात असल्याची माहीती मुळाली त्यानुसार त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. नेहरुनगर पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही कामगिरी अवघ्या ४८ तासात केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -