घरमुंबईशिक्षकाने केले हृदय दान, वाचवले ६ जणांचे प्राण!

शिक्षकाने केले हृदय दान, वाचवले ६ जणांचे प्राण!

Subscribe

मुंबईत एका शिक्षकाने आपल्या मरणानंतर अवयवय दान करुन सहा जणांचा प्राण वाचवला आहे.

मुंबईच्या शाळेतील चित्रकला शिक्षकाने आपल्या मरणानंतर अवयव दान करुन सहा जणांना जीवदान दिलं आहे. हृदय, यकृत, डोळे, त्वचा आणि हाडांचे दान या अवयवदात्याने केले आहे. गुरुवारी केलेल्या हृदय प्रत्यारोपणामुळे सुरतच्या एका ४८ वर्षीय महिलेला जीवदान मिळालं आहे. मुंबईत यंदाच्या वर्षीचं दुसरं हृदय प्रत्यारोपण होतं. मुलुंडच्या फोर्टीस हॉस्पिटलमध्ये ही प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. अवयवदाता मुंबई वांद्रेच्या शाळेत चित्रकला शिक्षक म्हणून काम करत होते. यांना मेंदुतील रक्तस्त्रावामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. पण, थोड्याच वेळात त्यांना मेंदूमृत घोषित करण्यात आले. कुटुंबीयांचं समुपदेशन केल्यानंतर या व्यक्तीचं हृदय, त्वचा, हाडं आणि यकृत हे अवयव दान करण्यात आले.

ग्रीन कॉरिडोरमार्फत अवयव रुग्णालयात पोहोचवले

अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झालेली महिला सुरतला राहणारी होती. या महिलेला डालेटेड कार्डियोमायोपॅथी या हृदयासंदर्भातल्या गंभीर आजाराचं निदान करण्यात आलं होतं. त्यांचे नाव १२ डिसेंबर २०१८ पासून हृदय प्रत्यारोपणासाठी प्रतीक्षा यादीत नोंदवलेले होते. त्यामुळे तिला डॉक्टरांनी हृदय प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिला होता. अखेर शनिवारी या महिलेवर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. अवयव रूग्णालयात पोहोचवण्यासाठी ग्रीन कॉरिडोर तयार करण्यात आला होता. नेरूळ ते मुलुंड हा २१ किमीचा प्रवास अवघ्या २३ मिनिटांमध्ये पार करण्यात आला. रूग्णाच्या परिस्थितीची माहिती देताना कार्डियाक टीमचे प्रमुख डॉ. अन्वय मुळे म्हणाले, “प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. रूग्णाला देखरेखीसाठी आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं.” मुलुंडच्या फोर्टीस रूग्णालयातील डॉ. अन्वय मुळे आणि कार्डियाक ट्रान्सप्लांट टीमने ही शस्त्रक्रिया यशस्वी केली. फोर्टीस रूग्णालयाची ही ९० वी यशस्वी शस्त्रक्रिया होती. नवी मुंबईच्या ४४ वर्षीय व्यक्तीच्या अवयवदानामुळे या महिलेचे प्राण वाचण्यास मदत झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -