घरमुंबईनिर्माल्यापासून खत निर्मितीसाठी ‘ग्रीन अंब्रेला’ सरसावली

निर्माल्यापासून खत निर्मितीसाठी ‘ग्रीन अंब्रेला’ सरसावली

Subscribe

उत्सवाच्या काळात जमा होणार्‍या निर्माल्यापासून संस्थेतर्फे खतनिमिर्ती करण्यात येते. यासाठी स्थानिक सामजिक संस्थांना बरोबर घेऊन मुंबईतील 50 गणेश मंडळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

मुंबई : मुंबई शहरात कचरा ही मोठी समस्या आहे. गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणात हार, फुले यांचे निर्माल्य जमा होते. पण त्याची विल्हेवाट योग्य प्रकारे लावली जात नाही. यासाठी पर्यावरणाची होणारी हानी टाळण्यासाठी ‘ग्रीन अंब्रेला’ या संस्थेतर्फे गणेशोत्सवात एका आगळा वेगळा उपक्रम मुंबई शहरात राबवण्यात येत आहे. उत्सवाच्या काळात जमा होणार्‍या निर्माल्यापासून संस्थेतर्फे खतनिमिर्ती करण्यात येते. यासाठी स्थानिक सामजिक संस्थांना बरोबर घेऊन मुंबईतील 50 गणेश मंडळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

गणेशोत्सवात दहा दिवस गणपती मंडळात मोठ्या प्रमाणात निर्माल्य जमा होते. हे पवित्र निर्माल्य लोकांच्या पायदळी तुडवले जाऊ नये, म्हणून पूर्वी नदीत अथवा वाहत्या पाण्यात विसर्जन करण्याची पद्धत होती. सध्याची नद्या, खाडी,समुद्र यांची स्थिती बघता हा मार्ग योग्य नाही. तसेच निर्माल्य कोणतीही प्रक्रिया न करता थेट डम्पिंग ग्राउंडवर गेले तर मिथेनसारखे ग्लोबल वॉर्मिंग वाढवणारे ग्रीन हाऊस गॅसेस तयार होतात. ते घातक असतात. याचा विचार करून ग्रीन अंब्रेला ऑर्गनायझेशन संस्थेने निर्माल्यापासून खत बनवण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

- Advertisement -

संस्थेकडून मंडळांना एक टोपली दिली जाते. यात शक्य झाल्यास सुका पालापाचोळा आणि निर्माल्य समप्रमाणात एकावर एक थर लावायचे असतात. निर्माल्याचे विघटन होण्यासाठी मंडळांना जीवाणूंचे कल्चर दिले जाते. आठवड्यातून एकदा कल्चर आणि निमपेंड घालावी लागते. चार दिवसांनी वर खाली हलवावे. टोपली भरल्यावर साधारण 40 ते 50 दिवसात खत तयार होते.

विक्रोळी,चेंबूर, परेल, दादर,गोंवडी,कुर्ला,मालाड,बोरिवली,ठाणे या विभागातील मंडळात हा उपक्रम राबविण्यात येत आहे. निसर्ग वेध आणि रोट्रॅक्ट क्लब,विक्रोळी शाखा यांच्या सहकार्यामुळे विक्रोळी आणि चेंबूरमध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमातून खतनिर्मिती तर होणारच त्याबरोबर पर्यावरणाविषयी जागृतीही होत आहे, असे ग्रीन अब्रेलाचे अध्यक्ष विक्रम यंदे यांनी सांगितले.

- Advertisement -

हा खूप चांगला उपक्रम आहे. आम्ही हा उपक्रम आमच्या मंडळात दरवर्षी राबवणार आहोत तसेच घरातील गणपती उत्सवात निर्माण होणारे निर्माल्यही पाण्यात न सोडता खतनिर्मितीसाठी देण्याचे आवाहन करणार आहोत.
– समीर कदम, सार्वजनिक उत्सव समिती, गणेश मैदान, विक्रोळी.

संपर्क :

विक्रम यंदे – 98339 88166
मंजिरी तोरसकर 9773848287
डॉ.भाग्यश्री टिळक 9869269208
समीर निवळे 9594615739

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -