घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरमराठा आंदोलनाचा भडका ; गेवराई पायगाच्या सरपंचाने जाळली स्वतःची कार

मराठा आंदोलनाचा भडका ; गेवराई पायगाच्या सरपंचाने जाळली स्वतःची कार

Subscribe

1 सप्टेंबर रोजी जालना जिल्ह्यात मराठा आंदोलनकर्त्यांवर झालेल्या लाठीचार्जचे पडसाद संपूर्ण राज्यभर दिसून येत आहेत.

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणासाठी काढलेल्या 57 मोर्चाने संपूर्ण देशाला अशाही प्रकारे आपल्या मागण्यांसाठी आवाज उठवल्या जातो हे दाखवून दिले होते. मात्र, त्यानंतरही मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे तो तसाच रेंगाळत पडला आहे. दरम्यान जालना जिल्ह्यातील अंतरावली सराटी येथे सुरू असलेल्या उपोषणकर्त्यांसह उपस्थितांवर काल झालेल्या बेछूट लाठीचार्जचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले आहे. आता या आंदोलनाचा भडका उडाला असून, एका सरपंचाने निषेध नोंदविण्यासाठी चक्क स्वतःकडील नवी कोरी कारच जाळून टाकली आहे. तेव्हा आता हे आंदोलन राज्यभर पेटण्याची चिन्हे आहेत.(Outbreak of the Maratha movement; Sarpanch of Gevrai Paiga burnt his own car)

1 सप्टेंबर रोजी जालना जिल्ह्यात मराठा आंदोलनकर्त्यांवर झालेल्या लाठीचार्जचे पडसाद संपूर्ण राज्यभर दिसून येत आहेत. गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे यांनी वेगळ्या पद्धतीने या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. त्यांनी स्वतःची नवी वर्षभरापूर्वी घेतलेली कार वाहन जाळून टाकत घटनेचा निषेध व्यक्त केला. फुलंब्री येथील पाल फाटा येथे त्यांनी हे वाहन जाळले आहे.

- Advertisement -

काय म्हणाले गेवराई पायगावचे सरपंच?

झालेल्या लाठीचार्जचा निषेध नोंदविताना ते म्हणाले की, आमच्या लोकांवर हल्ला होणार असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. आता आम्ही स्वत:ची गाडी जाळली, पुढे आम्ही स्वत:ला जाळून घेऊन निषेध व्यक्त करू. सरकारने दोन दिवसांत ज्यांनी हा लाठीचार्ज केला त्यांच्यावर कारवाई केली नाही तर आम्ही स्वतला जाळून घेऊ, अशी उदिग्न प्रतिक्रिया मंगेश साबळे यांनी दिली.

हेही वाचा : जालन्यातील घटनेवरून उद्धव ठाकरेंनी साधला सरकारवर निशाणा, म्हणाले – “एक फुल, दोन हाफ…”

- Advertisement -

एसटी महामंडळ अलर्ट

जालना जिल्ह्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या कथित कारवाईचा निषेध करण्यासाठी राज्यभर मराठा समाज आंदोलन करण्याच्या तयारीत आहे. याचे पडसाद राज्यभर उमटू शकतात. त्यामुळेच या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाने राज्यातील सर्व एसटी आगारांना निर्देश देऊन एसटीच्या मालमत्तांचे नुकसान होणार नाही यासाठी खबरदारी घेण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा : मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज: मराठा महासंघाने लावले फडणवीसांवर गंभीर आरोप, म्हणाले- …

आधी उधळल्या होत्या नोटा

काही दिवसांपूर्वीच अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार, विहिरींना मंजुऱ्या न देणे, यामुले वैतागून दोन लाख रुपयांच्या नोटा फुलंब्री पंचायत समितीसमोर या व्यक्तीने उधळल्या होत्या ते मंगेश साबळे यांनीच त्यांच्या मालकीची स्वतःची कार जाळून हा निषेध व्यक्त केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -